Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली जिल्ह्यासह इस्लामपूर शहराच्या परंपरेला साजेशी स्पर्धेचे संयोजन करू : प्रतीक पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रीय युथ व्हॉलीबॉल पुरुष व महिला स्पर्धा घेण्याचा महाराष्ट्र राज्यास तिसर्‍यांदा तसेच सांगली जिल्ह्यास पहिल्यांदा मा

जयंत प्रिमियर कबड्डी लिगच्या पहिल्याच दिवशीच्या सामन्यांत खेळाडूंची रोमहर्षक चढाई
रोहित शर्माने लुटला होळीचा आनंद
कोरोनामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी : रामदास आठवलेंचा जावईशोध

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रीय युथ व्हॉलीबॉल पुरुष व महिला स्पर्धा घेण्याचा महाराष्ट्र राज्यास तिसर्‍यांदा तसेच सांगली जिल्ह्यास पहिल्यांदा मान मिळाला आहे. सांगली जिल्हा व इस्लामपूर शहराचा इतिहास व परंपरेला साजेसे या स्पर्धेचे संयोजन करू, असा विश्‍वास महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी इस्लामपूर येथे व्यक्त केला. मंगळवार, दि. 10 ते रविवार 15 मे दरम्यान इस्लामपूर येथील पोलीस परेड मैदानावर ही स्पर्धा होत आहे.
प्रतिक पाटील यांनी युथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल पुरुष व महिला स्पर्धेच्या तयारीची पहाणी करून कार्यकर्त्यांना सूचना केल्या. यावेळी त्यांनी बैठक व्यवस्था, मैदान, व्यासपीठ व प्रकाश झोत आदी कामांची पहाणी करून संबंधितांकडून कामांचा आढावा घेतला. यावेळी पोपट पाटील, प्रा. डॉ. संदीप पाटील, राजेंद्र सातपुते, मानसिंग पाटील, मोहन पाटील, अमोल खोत यांनी विविध कामांच्या तयारीचा आढावा मांडला.
प्रतिक पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळास मोठी परंपरा व इतिहास आहे. इस्लामपूर शहराची ओळख तर व्हॉलीबॉलची पंढरी अशी आहे. यापूर्वी सांगली जिल्हा व इस्लामपूर शहराने चार वेळा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा यशस्वी केल्या. ही स्पर्धाही तितक्याच भव्य व आकर्षकपणे यशस्वी होईल.
यावेळी प्राचार्य आर. डी. सावंत, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, प्रवीण पाटील, रमेश पाटील, अभिमन्यू जाधव, धीरज भोसले, प्रशांत कदम, संदीप माळी, विश्‍वजित पवार, क्रीडा शिक्षक पुजारी, राहुल भोई, संदीप शिंदे उपस्थित होते.

COMMENTS