शेतकऱ्यावर गोळीबार करणारा आरोपी ; जेरबंद कर्जत पोलिसांची कामगिरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यावर गोळीबार करणारा आरोपी ; जेरबंद कर्जत पोलिसांची कामगिरी

नगर/प्रतिनिधी : शेतकऱ्यावर गोळीबार करणारा आणि चार गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी उस्मानाबाद येथे पकडण्यात कर्जत पोलीसांना यश आले आहे. करण पंच्याहत्तर

सर्वाधिक दूध पुरवठा करणार्‍या संस्था व कृत्रिमरेतकांचा गौरव :परजणे
अहमदनगर मनपा सभागृह नेतेपदी अशोक बडे यांची नियुक्ती
आर.जे.एस नर्सिंग कॉलेज मध्ये फाळणी वेदना स्मृतिदिन उत्सहात साजरा.

नगर/प्रतिनिधी : शेतकऱ्यावर गोळीबार करणारा आणि चार गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी उस्मानाबाद येथे पकडण्यात कर्जत पोलीसांना यश आले आहे. करण पंच्याहत्तर काळे असे उस्मानाबाद मध्ये  पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी अमऱ्या उर्फ अमर दत्तु पवार यालाही मोठ्या शिताफीने कर्जत पोलिसांनी पकडले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल व कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलिस उप निरिक्षक अमरजित मोरे, पोलिस नाईक रविंद्र वाघ, शाम जाधव, पोलिस कॉन्स्टेबल देविदास पळसे, पोलिस कॉन्स्टेबल महादेव कोहक, पोलिस कॉन्स्टेबल शाहुराजे तिकटे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 10 एप्रिल  2021 रोजी रात्री 2  ते 3. वाजण्याच्या दरम्यान कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील निंबोडी ( ता. कर्जत) येथील शेतकऱ्याची शेळी चोरुन घेऊन चोरटे जात असताना शेळ्यांचे करडांनी आरडा ओरडा केल्याने शेतकऱ्याला जाग आली. यावेळी शेतक-यास  शेळी चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्याचे शेजारी राहणारे भाउबंद व नातेवाईक यांना त्याने आवाज देऊन बोलावून घेतले. ते चोरट्यांचा पाठलाग करु लागले. शेतकरी आपला पाठलाग करत आहेत. हे पाहुन चोरांनी शेळी सोडून पळून जावू लागले. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना पकडले असता, त्यांनी शेतकऱ्यावर अग्निशस्त्रातून फायर करुन दोन शेतकऱ्याना गंभीर जखमी केले होते. ही घटना अमऱ्या दत्तु पवार व करण पंच्याहत्तर काळे या दोघांनी केली असल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यातील आरोपींचा पोलीसांनी शोध घेऊन दि. 23 एप्रिल  2021 रोजी अमऱ्या उर्फ अमर दत्तु पवार हा नळी व़डगाव ( ता. भुम जि. उस्मानाबाद) येथे मोठ्या शिताफीने पकडला. त्यावेळी करण पंच्याहत्तर काळे हा पोलीसांना गुंगारा देऊन पळून गेला. तेव्हापासून तो अद्याप फरार होता. दि. 8 ऑक्टोबर 2021 रोजी करण पंच्याहत्तर काळे हा पाथरुड (ता. भुम जि. उस्मानाबाद ) येथे येणार असल्याबाबत कर्जत पोलिस निरीक्षक यादव यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरिक्षक यादव यांनी आपल्या पोलिस पथकाला उस्मानाबाद येथे जाऊन  फरार आरोपी करण पंच्याहत्तर काळे याचा शोध घेऊन पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे कर्जत पोलिसांनी उस्मानाबाद येथे जाऊन आरोपी काळे याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी आरोपी काळे याला पोलिस खाक्या दाखविताच त्याने  शेतकऱ्यांनी पकडल्याने गोळीबार केल्याची कबूली दिली. आरोपी काळे याच्यावर कर्जत, नगर, भूम, सातारा या ठिकाणी जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. यांनी केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे हे करित आहेत.Attachments area

COMMENTS