Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकावे

माजी नगराध्यक्ष वहाडणे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे मागणी

कोपरगाव शहर ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाचे अनेक सन्माननीय जेष्ठ नेते-पदाधिकारी यांचे महाराष्ट्रभर संपर्क अभियान सुरू आहे.भाजपा क

पारनेरला वराळ पतसंस्थेच्या ठेवीदारांचे उपोषण
LokNews24 l बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यांवर धाड
राहुरीत ठेकेदाराच्या घरी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

कोपरगाव शहर ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाचे अनेक सन्माननीय जेष्ठ नेते-पदाधिकारी यांचे महाराष्ट्रभर संपर्क अभियान सुरू आहे.भाजपा कार्यकर्त्यांचे मोठमोठे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. संबोधन-प्रबोधन करून येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने प्रचारयंत्रणा राबविली पाहिजे. सर्वांनी पक्षासाठी झोकून देऊन काम केले पाहिजे असे विचार मांडून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व प्रयत्न अत्यंत उपयुक्तच आहेत यात शंका नाही.पण वर्षानुवर्षे निष्ठेने भाजपाचे काम करणार्‍या जुन्या-जेष्ठ कार्यकर्त्यांना फारसे विचारात घेतले जात नाही.त्यांचे म्हणणे ऐकलेही जात नसल्याने त्यांच्यात मोठा असंतोष-नाराजी हे सर्वत्र जाणवते.त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसावे असे वाटते, त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकण्याची मागणी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, निष्ठावंत कार्यकर्ते पक्षविरोधी काम करणार नाहीतच,पण तेच कार्यकर्ते मनापासून कार्यरत झाले नाहीतर पक्षाची हानी होणारच हेही सत्य नाकारून चालणार नाही. म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रभर अभियान राबवून जुन्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकले गेले पाहिजे. जर तसे झाले नाही तर कार्यकर्त्यांच्या मनात साठलेला असंतोष ऐन आगामी विधानसभा निवडणुकीत उफाळून आला तर अवघड होईल. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनातील नाराजी-असंतोष जाणून घ्यायला हरकत नसावी अशी विनंती कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा भजपाचे जेष्ठ निष्ठावंत नेते विजय वहाडणे यांनी भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवत केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, अनेक निष्ठावंत जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मांडत असल्याचे वहाडणे यांनी म्हटले आहे.

COMMENTS