Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

के.जे.सोमैया महाविद्यालयात ’डोळ्यांची काळजी’ विषयावर व्याख्यान  

कोपरगाव/प्रतिनिधीः स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात स्टुडेन्ट मेंटोरिंग प्रोग्राम व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्

अमृतवाहिनी च्या 80 विद्यार्थ्यांची इन्फोसिस व एक्सेन्चर मध्ये निवड
संत ज्ञानेश्‍वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा त्वरित सादर करा
तक्रारदार शेख यांचा जबाब नोंदवला जाणार

कोपरगाव/प्रतिनिधीः स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात स्टुडेन्ट मेंटोरिंग प्रोग्राम व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या संयुक्त विद्यमाने ’डोळ्यांची काळजी’  या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यान सत्रासाठी कोपरगाव शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.सोनल वाबळे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
सध्या डोळ्यांच्या आजारांची साथ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या व्याख्यानाचे विशेषत्वानेआयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.सोनल वाबळे यांनी मानवी जीवनात डोळ्याचे महत्व विशद करतांना साथीच्या आजारापासून डोळ्यांची निगा कशी राखावी. यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच डोळे निरोगी राहण्यासाठी सकस आहार व व्यायामाबरोबरच मोबाईल व इतर सोशल मीडियापासून विद्यार्थ्यांनी दूर राहिले पाहिजे. उद्याचा सुदृढ व सशक्त भारत निर्माण करण्याची ताकत विद्यार्थ्यांमध्ये असल्याने सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. याविषयी त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात शोभाताई रोहमारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी हितगुज साधतांनाच डॉक्टरांनी दिलेल्या अनमोल मार्गदर्शनाचा आपल्या जीवनात अंगीकार करावा व डोळ्यांची तसेच आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही केले. या आरोग्य सत्राच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, विश्‍वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो.डॉ. विजय ठाणगे यांनी महाविद्यालयात राबवित असलेल्या विद्यार्थी केंद्रित अनेक योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा आहेर यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्टुडेन्ट मेंटोरिग प्रोग्रामचे समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी केले. याप्रसंगी प्रो.डॉ. संतोष पगारे, डॉ.सुरेखा भिंगारदिवे, प्रा.रोहन यादव, प्रा.मुकेश माळवदे, प्रा.अजित धनवटे, प्रा.सोनाली आव्हाड, प्रा.स्वागत रणधीर यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS