Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झुंडशाहीने कायदे बदलता येत नाही भुजबळांची आरक्षणाच्या निर्णयावर टीका

मुंबई ः राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केला असला तरी, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील एक भाग असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र या नि

मंत्री छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
गावबंदी करणार्‍याला तुरुंगात पाठवा : ना. भुजबळांनी सांगितली कायद्यातील तरतूद
Yeola :इगतपुरी येथील ट्रेनमध्ये झालेली घटना अतिशय निंदनीय – भुजबळ (Video)

मुंबई ः राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केला असला तरी, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील एक भाग असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र या निर्णयावर टीका केली आहे. राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही, असा दावा भुजबळांनी केला आहे या प्रकरणी मराठा समाजाची फसवणूक झाली आहे. यापुढे मराठा समाजाला इडब्ल्यूएस व ओपनमधील आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असे ते म्हणाले.

सरकारने मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली. तसेच तसा अध्यादेशही काढला. या घटनाक्रमामुळे राज्यभरातील मराठा समाजाने आनंद व्यक्त केला आहे. पण मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचा हा विजय नसल्याचा दावा केला आहे. मराठा समाजाचा विजय झाला असे वाटते. पण मला तसे काही वाटत नाही. अशा प्रकारच्या झुंडशाहीने नियम व कायदे बदलता येत नाही. आम्ही सुद्धा कुणाशी पक्षपात न करता काम करण्याची शपथ घेतली होती, असे ते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला हाणताना म्हणाले. सरकारने जारी केलेला अध्यादेश हा अध्यादेश नाही. ही केवळ सूचना व नोटीस आहे. याचे रुपांतर नंतर अध्यादेशात होईल. 16 फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती आक्षेप मागवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाच्या जे वकील असतील, सुशिक्षित असतील त्यांनी या सर्वाचा अभ्यास करून त्यावर लाखोंनी हरकती नोंदवाव्यात. ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनीही यात पुढाकार घेऊन या प्रकरणातील दुसरी बाजू सरकारच्या लक्षात आणून देण्याचे काम करावे, असे ते म्हणाले.

COMMENTS