शिर्डी प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील साकुरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत 29 कोटी 98 लाख रुपये किमतीच्या साकुरी पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ म

शिर्डी प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील साकुरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत 29 कोटी 98 लाख रुपये किमतीच्या साकुरी पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. ही योजना भारत सरकार व महाराष्ट्र शासन ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अंतर्गत व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई रोहम, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंद नाना सदाफळ, दीपक रोहम, सरपंच मेघनाताई दंडवते, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, साकुरी संस्थान च्या कन्याकुमारी माधवीताई, सभापती भाऊसाहेब जेजुरकर, सुधाकर दंडवते, अनुप कदम, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, उपसरपंच रावसाहेब बनसोडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीश राव बावके, संदीप दंडवते, उद्योजक आशिष दंडवते, महेश रेवगडे, हरीश शीरकांडे, बबन बनसोडे, कानिफ बावके, रमेश गायकवाड, शिवाजी नजन, मोगल नाना बनसोडे, सिंधुताई देवकर, निकिता रोहम, गीतांजली शिरकांडे, रूपाली रोहोम, अनिल दंडवते, विलास रोहम,गोरक्षनाथ डांगे, अशोकराव दंडवते, शामू नाना रोहम, अशोक बावके, भास्कर बावके, शांताराम गांगड, भारत बनसोडे, सुरेश बनसोडे, युनूस भाई पठाण, सुदाम बनसोडे, बाबासाहेब शिंदे, बाबासाहेब रोहम, बावके पुंडलिक, उमाकांत शिरकांडे, स्वप्निल बावके, कॉन्ट्रॅक्टर प्रकाश गव्हाणे, ग्रामसेवक डूबे भाऊसाहेब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
COMMENTS