Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुपर ५० उपक्रम निवड चाचणीचा अर्ज भरण्यास अंतिम मुदतवाढ

विद्यार्थ्यांना ११ जुलै पर्यंत करता येणार अर्ज १६ जुलैला होणार परीक्षा

नाशिक : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुपर ५० उपक्रमाच्या निवड परीक्षेसाठी दि. ६ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती, विद्यार्थ्यां

रवी राणांना भेटल्यानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर
अपहरण करून सांगली जिल्ह्यात नेणारे खंडणी बहाद्दर मुंबई पोलिसांच्या अटकेत  
कृषि उद्योजकतेच्या आधारावर आपण जगावर राज्य करु ः डॉ.पाठक

नाशिक : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुपर ५० उपक्रमाच्या निवड परीक्षेसाठी दि. ६ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती, विद्यार्थ्यांच्या सोयीकरता ऑफलाईन पद्धतीने होणारी नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करण्यात आली होती, ऑनलाईन पद्धतीचा परीक्षा अर्ज सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता यावे यासाठी काही शैक्षणिक संस्था व संघटना यांनी परीक्षेसाठीचा अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती या अनुषंगाने सुपर ५० उपक्रमाच्या निवड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, सदर मुदत वाढ अंतिम असून ११ जुलै रोजी ऑनलाईन प्रवेशाची लिंक रात्री १२ वाजता बंद करण्यात येणार आहे, यानंतर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. निवड परीक्षेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने देखील भरता येणार आहे त्यासाठी खालील लिंकवर जाऊन https://forms.gle/zkRRbs5MKq3et9i36

अथवा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. प्रत्येक पंचायत समिती मध्ये गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात परीक्षेचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला असून तिथेच तो भरावा लागणार आहे. प्रत्येक तालुक्यात परीक्षेसाठी परीक्षा केंद्र असणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठीचे सर्व नियम व निकष वाचून अर्ज भरावा असे आवाहन सुपर ५० निवड समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 मागील वर्षात जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात आलेला नाविन्यपूर्ण सुपर ५० हा उपक्रम यावर्षी देखील जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने सन २०२३- २४ व २०२४-२५ या दोन वर्षांसाठी सुपर ५० हा उपक्रम राबवण्यात येणार असून यावर्षी संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित, अंशत: अनुदानित विद्यालयातील निवड चाचणी परीक्षेद्वारे जिल्हा परिषदेने विहित केलेल्या निकषानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण सामाजिक प्रवर्गातील व दिव्यांग अशा ११० विद्यार्थ्यांची निवड करण्यात  येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी च्या नियमित अभ्यासक्रमाबरोबर JEE व NEET या व्यावसायिक पात्रता प्रवेश परीक्षांसाठी नि:शुल्क निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त गरीब गरजू विद्यार्थ्यांनी सुपर ५० उपक्रमाच्या निवड चाचणी परीक्षेत सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

परीक्षा १२५ गुणांची असून सदर परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे प्रश्न राहतील.

विषय : Phyisics –  २५ प्रश्न २५ गुण

Chemistry – २५ प्रश्न २५ गुण

Biology – २५ प्रश्न २५ गुण

Maths – २५ प्रश्न २५ गुण

English – २५ प्रश्न २५ गुण

विद्यार्थ्यांना आपले बैठक क्रमांक हे जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेच्या आधी २ दिवस उपलब्ध करून देण्यात येतील.

COMMENTS