Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारणा डाव्या कालव्यासाठी गेलेल्या जमिनीचा बागायतीप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी

शिराळा / प्रतिनिधी : वारणा डाव्या कालव्यामध्ये चिखली, ता. शिराळा येथील शेतकर्‍यांच्या गेलेल्या जमिनीचे शासनाने कोरडवाहू प्रमाणे न देता बागायती जम

पाटण तालुक्यात पत्रकार दिनी ऊसतोड मजुरांच्या बालकांना खाऊ वाटप
राजारामबापू कारखान्याच्या कर्मचार्‍यांना 12 टक्के पगारवाढ : पी आर पाटील
पाटण तालुक्यात वीज पडल्याने 2 म्हैशीचा मृत्यू

शिराळा / प्रतिनिधी : वारणा डाव्या कालव्यामध्ये चिखली, ता. शिराळा येथील शेतकर्‍यांच्या गेलेल्या जमिनीचे शासनाने कोरडवाहू प्रमाणे न देता बागायती जमिनीप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. तसेच कालव्यासाठी गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी आंदोलनावेळी केली.
मंगळवारी तहसील कार्यालय शिराळा येथे चिखली ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, सुखदेव पाटील, सम्राट महाडिक, रणजीतसिंह नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासनाने लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
चिखली (ता. शिराळा) येथील ग्रामस्थांच्या जमिनी गेली 33 वर्षे पाटबंधारे विभागाने वारणा डाव्या कालव्यासाठी संपादित केल्या आहेत. मात्र, या शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शासनाने दिली नाही. त्यामुळे हे ग्रामस्थ आक्रमक होऊन शिराळा येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलनास बसले होते. शेतकर्‍यांनी यावेळी शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी शिराळा मार्केट यार्डपासून चालत आंदोलकांनी आपल्या जमिनीचा मोबदला मिळावा, अशी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाकडे येऊन त्यांनी आंदोलन केले. तहसीलदार गणेश शिंदे, पाटबंधारे कार्यकारी अभियंता देवापाश शिंदे, नायब तहसीलदार व्ही. डी. महाजन, अनिल लांडगे सहाय्यक अभियंता, अनिकेत शिर्के सहाय्यक अभियंता, विलास पाटील शाखा अभियंता उपस्थित होते.
तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, आंदोलनात लोकांची कोणतीही अवहेलना होणार नाही. शेतकर्‍यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल. डाव्या कालव्याच्या बादीत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत, मोबदला देण्यासाठी येत्या 17 फेब्रुवारी सर्व संबंधित अधिकार्‍यांसमवेत चिखली येथे बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल.
पाटबंधारे कार्यकारी अभियंता म्हणाले, हा प्रश्‍न खाजगी वाटाघाटी करून सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. शासन व बाधित शेतकर्‍यांमधील योग्य तो तोडगा काढून असणार्‍या सर्व मागण्या आम्ही मार्गी लावणार आहोत. शासन स्तरावर शेतकर्‍यांच्या या प्रश्‍नावर शासन अनुकूल असून लवकरच मार्ग निघेल.
आंदोलनास चिखली येथील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS