Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीपावलीनिमित्त श्री साईबाबांच्या मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिपावलीनिमित्त श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी कुबेर पुजन संस्थानचे मुख

शहराची वाट लावण्यात महापालिकेचे योगदान सर्वाधिक
भाजप मधल्या ही त्या नेत्यांची इडीने माहिती जाहीर करावी (Video)
प्रा.अर्जुन गायकवाड यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिपावलीनिमित्त श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी कुबेर पुजन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रींचे मुर्तिवर विविध सुवर्ण हिरेजडीत 4 किलो 800 ग्रॅम वजनाचे आभुषणे चढविण्यात आले असून त्याची अंदाजे रक्कम 1 कोटी 29 लाख 69 हजार 495 रूपये इतकी आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुढी परंपरेनुसार दिपावली निमित्त श्री लक्ष्मी पुजन उत्सव साजरा करण्यात आला. आज सायंकाळी 05.00 ते 05.55 यावेळेत समाधी मंदिराच्या गाभा-यात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्मी-कूबेर पूजन, सरस्वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम झाले. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडूळे, लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी, मंदिर प्रमुख विष्णु थेरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मी-कूबेर पूजन झाल्यानंतर सायंकाळी 06.00 वाजता श्रींची धुपारती झाली. धुपारतीनंतर साईभक्तांसाठी दर्शनरांग सुरु करण्यात आली. तर रात्रौ 10.00 वाजता श्रींची शेजारती झाली. दिपावली उत्सवानिमित्त जालंधर, पंजाब येथील साईभक्त श्री मानव खुराणा, यांच्या वतीने देणगीस्वरुपात विद्युत रोषणाई व श्री साईबाबा समाधी मंदिरात व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

COMMENTS