Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजय स्तंभास लाखो आंबेडकरी अनुयायांनी केले अभिवादन

पुणे/प्रतिनिधी ः कोरेगाव भीमा या ठिकाणी रविवारी  205 वा शौर्य दिन साजरा करण्यात आला. यावेळ शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्

कांदा पीक नोंद नसल्यास अहवाल सादर करा ः नामदेव ठोंबळ
बहिणीला त्रास देत असल्याने खून केल्याची कबूली
संगमनेरमध्ये महानगर बँकेची बनावट सोने तारणप्रकरणी 83 लाखाची फसवणूक

पुणे/प्रतिनिधी ः कोरेगाव भीमा या ठिकाणी रविवारी  205 वा शौर्य दिन साजरा करण्यात आला. यावेळ शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी पहाटेपासूनच याठिकाणी मोठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत होती. विजय स्तंभास लाखो आंबेडकरी अनुयांयानी अभिवादन करण्यासाठी गर्दी उसळली होती.

राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी पहाटेपासूनच याठिकाणी मोठी गर्दी केली होती. विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली आहे. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. कोरेगाव याठिकाणी 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रज आणि पेशव्यांमध्ये ऐतिहासिक लढाई झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी या लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधला. 1 जानेवारी 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून शौर्य दिनाची प्रथा सुरु झाली. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कुटुंबासह विजयस्तंभाला भेट देत अभिवादन केले. रिपाइंचे नेते सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी देखील विजयस्तंभाला भेट देत अभिवादन केले. तर शाई फेकीची धमकी आल्यामुळे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले. प्रशासनाकडून विजयस्तंभ परिसरात जोरदार तयारी करण्यात आली होती. यंदाचा शौर्यदिन निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज होते. अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे शहर पोलिस तसेच पुणे ग्रामीण पोलीसांकडून सर्व खबरदार घेतली जात होती. याठिकाणी साडेचारहजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला.

COMMENTS