Homeताज्या बातम्यासंपादकीय

पायाभूत सुविधांचा अभाव

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष गेल्याच वर्षी पूर्ण झाले असून, या अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला असला तरी, देशा

अमलीपदार्थांचा वाढता वापर
राजकीय निवाडा..
निर्यातबंदी आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष गेल्याच वर्षी पूर्ण झाले असून, या अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला असला तरी, देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयी-सुविधा पुरेशा प्रमाणात मिळतात का, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. मोठ-मोठ्या शहरामध्ये तर ऐन सणासुदीला रस्त्यावर अचानक झालेल्या गर्दीचा परिणाम म्हणून वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात येत आहे. तसेच शनिवार-रविवार तसेच सलग सुट्टीच्या कालावधीत महामार्गाशेजारील गावा-गावांमधील लोकांना वाहनांच्या रांगा बघत बसण्याची पाळी येत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी पर्यायी रस्ते नसल्याने गावा-गावातील लोकांच्या बाजारपेठा विस्कळीत झाल्या. मात्र, शहरातील लोक शिकलेले हे लोक विकासात्मक कामासाठी योगदान देण्यापेक्षा सरकारी यंत्रणेला न्यायालयाच्या दंडूका दाखवत सरकारी यंत्रणेने विकासाचे काम अन्य ठिकाणावरून करण्यास भाग पाडतात. याचाच प्रत्यय नुकतात पुणे शहरात येवू लागला आहे. दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने शहरातील लक्ष्मी रोडवरील वाहतूक पोलीस बंदोबस्तात बंद करण्याची वेळ येत आहे. पुणे तिथे काय उने अशी म्हण आहे. मात्र, पुणेकरांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला तरी आम्हाला काय घेणे-देणे, अशा विचारांचे लोक पुणे शहरात राहत असल्याचे अनुभवास येत आहे. गेल्या चार वर्षापासून मेट्रोच्या कामानिमित्त पुणे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. राज्य परिवहन विभागाच्या बसेस मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात जाणार्‍या राज्य परिवहन विभागाच्या बसेस अन्यत्र ठिकाणी थांबत आहेत. अशा परिस्थितीत पुणे महानगर परिवहन विभागाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, अधिकारी अधिकार्‍यांच्या तोर्‍यात असतात, तर कामगार संघटनांच्या इशार्‍यावर नाचतात. यामध्ये नाहक त्रास पुणे शहराशी काहीही देणे-घेणे नसलेल्या नागरिकांना होत असतो. गेल्या चार-पाच महिन्यात ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, 75 वर्षापेक्षा वयाने जास्त असलेल्या लोकांना राज्य परिवहन महामंडळाने सवलत जाहीर केल्या आहेत. मात्र, ह्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी दिवसाच फिरण्याची अलिखित अट घालण्यात आली आहे. कारण रात्रीच्या वेळेला सुटत असलेल्या सर्व बस बंद करून अधिकारी वर्गाने काय साध्य केले हे मात्र समजू शकले नाही. राज्य परिवहन विभागाच्या प्रत्येक बसचा फेरा हा उत्पन्न देणाराच असावाा, असा महामंडळ सुरु करतानाचा हेतू नव्हता. मात्र, अधिकार्‍यांना स्वत:ची पाठ थोपाटून घेण्याच्या सवयीमुळे त्यांनी प्रवाशांच्या सेवेस तत्पर या ब्रीद वाक्यास तिलांजली दिली आहे.
पूर्वी वाहतूकीची साधने जास्त नव्हती. सध्या तशी परिस्थिती राहिली नाही. मात्र, अधिकार्‍यांनी उत्पन्न वाढवण्याच्या हेतूलाच पाठीशी घालण्यात आले आहे. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यास अन्य मोठ्या सणानिमित्त राज्य परिवहन विभागाकडे आरक्षणासाठी रांगा लागतात. ह्या एक दिवसासाठी असल्याचे माहिती असूनही नियमित प्रवास करणार्‍यांना मात्र, नाहक त्रासास सामोरे जाण्याची वेळ परिवहन महामंडळ आणते. शासनाच्याच गाड्याद्वारे  शैक्षणिक सहली तसेच अभ्यास दौरे काढण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र, हे करताना नियमित प्रवास करणारे विद्यार्थी मात्र, परिक्षा काळातही वार्‍यावर सोडून रोख मिळणार्‍या उत्पन्नाकडे लक्ष दिले जात आहे. या प्रकाराने नियमित पास काढून प्रवास करणारे नोकरदार व विद्यार्थी राज्य परिवहन विभागाच्या गाडीपासून दूर जावू लागले असल्याचे दिसून येत आहेत. आगावू पैसे भरूनही नागरिकांना वेटीस धरणार्‍या यंत्रणेला अखेर धडा शिकवण्याशिवाय पर्याय नसल्याचेही विचार मग सामान्य नागरिक करू लागतो. मग एसटीच्या टायरमधील हवा सोडणे, रस्त्यात मुद्दाम अडथळे निर्माण करणे यासारखे प्रकार करण्यास जनता मागे-पुढे पाहत नाही. 

COMMENTS