मराठा आरक्षणाला लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली आहे. बीडच्या शिरूर तालुक्यात मोडीलिपी तज्ज्ञांना मनोज जरांगे यांच्या मूळगावी

मराठा आरक्षणाला लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली आहे. बीडच्या शिरूर तालुक्यात मोडीलिपी तज्ज्ञांना मनोज जरांगे यांच्या मूळगावी मातोरी या ठिकाणी कुणबी असल्याची नोंद आढळली. मोडीलिपी संशोधन पथक शिरूर दौऱ्यावर असताना शिरूरच्या तहसील कार्यालयात मातोरीच्या नोंदी आल्या या नोंदी मोडीलिपीत होत्या. या मध्ये मनोज जरांगे पाटील यांचा कुणबी असल्याची नोंद आढळली . तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील कुणबी असल्याचे पुरावे आढळले आहे. या मुळे आता जरांगे यांचा कुणबी प्रमाण मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आरक्षण ची मागणी करणारे मनोज जरांगे स्वतः कुणबी आहे का यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या मुळे त्यांना दिलासा मिळाला असून आता ते कुणबी असल्याचे प्रमाण मिळाले आहे. रविवारी मोडीलिपी संशोधन पथक शिरूर दौऱ्यावर असताना मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील हे कुणबी असून त्यांचे गाव मातोरी तालुका शिरूर कासार गावातले कागद आढळले.
COMMENTS