पुणे/प्रतिनिधी ः कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असा सवाल विचारणारे बॅनर्स कसबा पेठेत लागले
पुणे/प्रतिनिधी ः कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असा सवाल विचारणारे बॅनर्स कसबा पेठेत लागले आहेत. कसबा, पिंपरी-चिंचवड मतदारसंघाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारण्यात आली. तेव्हापासून भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत.
बहुचर्चित ठरणार्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवार जाहीर केले. कसबा पेठ येथून अपेक्षेप्रमाणे हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले, तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र रासणे यांच्या नावाला हिंदू महासभेने विरोध केला आहे. आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले. एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. चिंचवडमध्ये भाजपने ही परंपरा पाळली. मात्र, कसबापेठेत ही परंपरा पाळली नाही. त्यामुळे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू महासभेनेही यावरुन टीका केली आहे. पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपला थेट प्रश्न विचारणारे बॅनर्स लागले आहेत. कुलकर्णींचा मतदारसंघ गेला. टिळकांचा मतदारसंघ गेला. आता नंबर बापटांचा का?, असा सवाल या बॅनर्समधून करण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनर्सची पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या बॅनर्सवर एक जागरुक नागरिक असे लिहिण्यात आले आहे. ब्राम्हण समाजात तीव्र नाराजी पसरल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून चिंचवडमध्ये न्याय तर कसब्यात अन्याय केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आनंद दवे सोमवारी कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे कसब्यात हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले. मुक्ता यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही उमेदवारी मागितली होती. पण भाजपने दिली नाही. हा मुक्ता यांच्या कामावर अन्याय आहे. पुण्यात एकही ब्राह्मण उमेदवार नाही ही अन्यायाची भावना समाजातही आहे. पण आम्ही भाजपसोबत राहू, असेही ते म्हणाले.
COMMENTS