Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज येथील दोन विधीज्ञा वर पुण्याच्या कोयता गँगचा हल्ला

पोलिस उप निरीक्षक राजेश पाटील यांनी मुसक्या आवळल्या

केज प्रतिनिधी - केज येथील विधीज्ञ प्रदीप इतापे हे क्राईमचे विधीज्ञ म्हणून केज न्यायालयात गेली सहा वर्षा पासुन काम करतात.दिनांक 12 जुलै 2023 रोजी

पुण्यात कोयता गँगची काढली धिंड
पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ

केज प्रतिनिधी – केज येथील विधीज्ञ प्रदीप इतापे हे क्राईमचे विधीज्ञ म्हणून केज न्यायालयात गेली सहा वर्षा पासुन काम करतात.दिनांक 12 जुलै 2023 रोजी प्रदीप देवीदास इतापे व त्यांचा मित्र एकनाथ रामभाऊ काळे हे दोघे सकाळी 9:00 वाजता स्कूटी गाडीने बीड येथे भूमी अभिलेख या कार्यालयात खाजगी कामासाठी गेले होते तेथील काम आटोपून परत केज कडे निघाले.रस्त्यात एका धाब्यावर त्यांनी जेवण करुन नंतर एकनाथ काळे हे स्कुटी चालवतअसतांना सहा वाजता सारूळ पाटीजवळ आले असता तीन अनोळखी मुले स्प्लेंडर गाडी क्रंमाक एम एच 23.बी-जी- 6793 वरून आले व स्कुटी या गाडी समोर आडवी लावून लातुरला जाण्याचा मार्ग विचारला आणी स्कुटीची चावी अन मोबाईल काढुन घेतला.आम्ही पुण्याच्या कोयता गँगचे सदस्य आहोत असे म्हणत पैशाची मागणी केली असता इतापे व काळे यांनी आम्ही तुम्हाला पैसे का दयावे ? असे बोलले असता एकाने दगड मारला तर दुसर्‍याने कोयत्याने एकनाथ काळे यांच्या वर वार केला. त्यांना वाचविण्याच्या नादात विधीज्ञ प्रदीप इतापे यांच्या हाताला मार लागताच जोरजोराने आरडाओरडा केली व त्याच वेळेस केज येथील पोलीस नाईक मुकुंद ढाकणे हे ड्यूटी करून गावी जात होते.त्यांनी चौकशी करताना आरोपींनी त्यांनाही मारण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी पोलिस आहे सांगुन ओळखपञ दाखविले त्यानंतर आरोपी नरमले त्यांनी पोलीस खाक्या दाखवताच आरोपी शांत झाले तसेच काकासाहेब पाळवदे,ज्ञानेश्वर थोरात यांनीही दोघांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.आरोपी गणेश एकनाथ मनाळे,विशाल राजाभाऊ कांबळे, यशवंतकुमार उत्तम लोथी सर्व राहाणार पाषान पुणे येथील आहेत या तीनही आरोपीनां केज येथील पोलीस निरीक्षक राजेश पाटील व पोलीस नाईक मुकुंद ढाकणे यांनी जेरबंद करून केज पोलीसस्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान अल्पवयीन आरोपींची सुधारगृहात रवानगी केली असुन एका आरोपीला केज न्यायालय येथे हजर करण्यात आले.

COMMENTS