पाटण / प्रतिनिधी : कोयना विभागात वन्य प्राण्यांचा त्रास चौपट वाढला आहे. वन्य प्राण्यांकडून होणार्या नुकसानीमुळे 80 टक्के शेतकर्यांनी शेती बंद
पाटण / प्रतिनिधी : कोयना विभागात वन्य प्राण्यांचा त्रास चौपट वाढला आहे. वन्य प्राण्यांकडून होणार्या नुकसानीमुळे 80 टक्के शेतकर्यांनी शेती बंद केली आहे. बिबट्याच्या हल्ल्याने शेतकर्यांचे पशुधन नष्ट होत आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकर्यांचे जीव जात आहेत. या सर्वांना कंटाळून आता कोयना विभागातील सर्वपक्षीय पदाधिकारी, जनता व शेतकर्यांनी तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यासंदर्भात बुधवार, दि. 23 ऑगस्टपासून हेळवाक (कोयनानगर) वन्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार रमेश पाटील यांना देण्यात आला आहे.
दरम्यान, वरील सर्वाबाबत तात्काळ बैठक होवून निर्णय न झाल्यास बायका-मुलांसह रस्त्यावर उतरून दि. 25 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करू, असा इशाराही पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समिती पाटण, महाविकास आघाडी, मनसे व कोयना विभागातील शेतकर्यांच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे, पाटण तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांपासून नुकसान होत आहे. 80 टक्के लोकांनी शेती करणे सोडून दिले आहे. पिकांचे वारंवार होणार्या नुकसानीबाबतीत भरपाई मिळण्यासाठी मागणी करूनही एकदा पंचनामा केल्यास पुन्हा पिकांचे नुकसान झाल्यास त्याबाबत विचारही होत नाही. चौरकुंपण (झटका मशिन) घालूनही गवे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्याबाबतीत वनखात्याचे धोरण स्पष्ट नाही.
गेल्या वर्षभरात गवारेड्याच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले असून चार ते पाच शेतकर्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. गवारेड्यांचे अतिक्रमण फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, वनखात्याकडून केल्या जाणार्या उपाययोजना तुटपुंंज्या आहेत. त्याचबरोबर कोयना नदीपात्रात मगरी सोडल्याने मासेमारी पूर्णपणे बंद झाली असून मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. वानर, माकडे, डुक्कर, मोर, कोल्हे, सांबर आदी प्राण्यांचा त्रास पूर्वीपेक्षा चौपट वाढला आहे. त्यामुळे इथला शेतकरी हवालदित झाला आहे.
COMMENTS