कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपरिषदेमार्फत जागतिक शून्य कचरा दिवस व स्वच्छता उत्सव 2023 या निमित्ताने बुधवारी जनजागृतीसाठी कोपरगाव नगरपरिषदेमार्
कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपरिषदेमार्फत जागतिक शून्य कचरा दिवस व स्वच्छता उत्सव 2023 या निमित्ताने बुधवारी जनजागृतीसाठी कोपरगाव नगरपरिषदेमार्फत स्वच्छता जागृती फेरी आणि स्वच्छता शपथ कार्यक्रमाचे आयोजन प्रशासक मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडे दहा वाजता नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालय आवारात स्वच्छता शपथ घेण्यात आली. त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी स्वच्छता कर्मचारी यांच्या समवेत कोपरगाव शहरातून स्वच्छता जागृती फेरी काढण्यात आली.
शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होईल आणि आपले शहर कचरा मुक्त होईल असा प्रामुख्याने उद्देश होता. तसेच दैनंदिन कचरा हा घंटा गाडीमध्ये देतांना तो विलगीकरण करून दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेस या संकलित कचर्यावर प्रक्रिया करणे सोपे होईल व त्या प्रक्रीयेवरचा खर्च कमी होऊ शकतो. तसेच नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा याबाबत देखील जनजागृती व्हावी असा या रॅली चा उद्देश होता. या जागृती फेरीचा आणखी महत्वाचा उद्देश म्हणजे शहरातील महिलांनी शहर स्वच्छते मध्ये उत्स्फुर्त सहभाग घ्यावा आणि आपले शहर भावीकाळात कचरा मुक्त व्हावे या उद्देशाने शासना मार्फत स्वच्छता उत्सव 2023 अंतर्गत विन्स अवार्ड 2023 ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेत भाग घेणेसाठी शहरातील महिलांनी एकत्रित अथवा व्ययक्तिक स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला असावा. शहर स्वच्छतेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल उपलब्ध दस्त ऐवजासह नगरपरिषद कार्यालयात संगणक विभागात उपलब्ध करून दिलेले मोफत अर्ज भरून दि 05 एप्रिल 2023 अखेर नगरपरिषद कार्यालयात सादर करणे बंधन कारक आहे. या उपक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले आहे. सदर उपक्रम यशस्वीततेसाठी कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, स्वच्छता निरीक्षक सुनील आरण, नोडल ऑफिसर भालचंद्र उंबरजे, शहर समन्वयक स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) प्रविण मोरे आदी नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS