Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार काळेंकडून कोपरगाव शहराच्या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी

कोपरगाव : कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावून रस्ते, वीज, आरोग्य आदी मुलभूत प्रश्‍न सोडवून कोपरगाव शहराला पुन्हा विकासाच्या व

ग्रामीण भागातील महिला बचतगटांचा ‘सुपर शॉपींग मॉल’
शोरुम समोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न
संगमनेरमध्ये ईडीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

कोपरगाव : कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावून रस्ते, वीज, आरोग्य आदी मुलभूत प्रश्‍न सोडवून कोपरगाव शहराला पुन्हा विकासाच्या वाटेवर आणणार्‍या आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील रस्त्याचा अजून एक प्रश्‍न मार्गी लावला असून त्यामुळे जवळपास चार ते पाच हजार नागरिकांची मागील अनेक वर्षापासूनची अडचण कायमची दूर झाली आहे.
कोपरगाव शहरातील अहमदनगर-मनमाड महामार्ग ते जानकीविश्‍व ह्या रस्त्याचे अस्तित्व जवळपास संपले होते.त्यामुळे अहमदनगर-मनमाड महामार्गालगत असणार्‍या आढाव वस्ती, जानकी विश्‍व, साई सिटी, भामानगर,रिद्धी सिद्धी नगर, निवारा सुभद्रानगर भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. विशेषत:ज्येष्ठ नागरीक,शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अनिरुद्ध काळे व सोमनाथ आढाव यांनी या भागातील नागरिकांची होत असलेली गैरसोय त्यामुळे या रस्त्याला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची गैरसोय लक्षात घेवून आ. आशुतोष काळे यांनी या रस्त्यासाठी 16 लक्ष रुपये निधी दिला असून नुकतेच या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली. यावेळी अनिरुद्ध काळे,सोमनाथ आढाव,कार्तिक सरदार, सतीश आढाव, विनोद थोरात, शशिकांत शेळके, सचिन थोरे, वाल्मिक चांदर, सार्थक आढाव, संजय अधिकार, माऊली बिडगर, सचिन गोर्डे, विजय खेडकर, बंडू आढाव, सागर जाधव, बाबासाहेब आढाव, शंकर आढाव, विठ्ठल आढाव, संतोष आढाव, भूषण मराठे आदी उपस्थित होते. रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय कायमची दूर होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आढाव वस्ती, जानकी विश्‍व, साई सिटी,भामानगर,रिद्धी सिद्धी नगर,निवारा सुभद्रानगर भागातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

COMMENTS