Homeताज्या बातम्यादेश

केएल राहुल आशिया कपच्या दोन सामन्यांमधून बाहेर

आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आगामी वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, या स्पर्धेतून

ऑटोग्राफनंतर एमएस धोनीने चाहत्याकडून मागितले चॉकलेट
भारतीय महिला संघाने पाकिस्तानला चारली धूळ
तब्बल एका दशकानंतर केकेआर अजिंक्य

आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आगामी वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, या स्पर्धेतून भारतीय संघाकडून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचे पुनरागमन होणे अपेक्षित आहे. मात्र, आता केएल राहुलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. याबद्दल भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. श्रेयस आणि केएल राहुल गेल्या जवळपास 4-5 महिन्यांपासून भारतीय संघातून दुखापतीमुळे दूर होते. श्रेयसच्या पाठीवर, तर केएल राहुलच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी यातून सावरण्यासाठी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम केले. त्यानंतर आता दुखापतीतून सावरल्यानंतर त्यांचा आशिया चषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. असे असले तरी केएल राहुलला अजूनही छोटी दुखापत असल्याचे सांगण्यात आले होते. आता तो आशिया चषकातील साखळी फेरीतील दोन सामन्यांना मुकणार असल्याचे द्रविडने स्पष्ट केले आहे.

COMMENTS