Homeताज्या बातम्याक्रीडा

केकेआरचे प्ले ऑफकडे दमदार पाऊल

क्रिकेट समिक्षक.

कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सचा ९८ धावांनी पराभव केला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना सुनील नारायणच्या झंझावाती खेळामुळे २० षटकार आणि

पुरुष आणि महिला कुस्तीपटूंच्या खुल्या निवड चाचणीचे आयोजन
रोहित शर्माने लुटला होळीचा आनंद
मयंक अग्रवालची प्रकृती बिघडली

कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सचा ९८ धावांनी पराभव केला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना सुनील नारायणच्या झंझावाती खेळामुळे २० षटकार आणि ६ विकेट्ससह २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ १६.१ शतकांत सर्वबाद १३७ धावांत गडगडला.  या सामन्यातील लखनौची फलंदाजी पुरती कोसळली 

             या विजयासह कोलकाता सोळा गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.  त्याच वेळी, लखनौचा निव्वळ धावगती -०.३७१  झाला आणि संघ पाचव्या स्थानावर पोहोचला.  लखनौ आता ८ मे  रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आपला पुढचा सामना खेळणार आहे. त्याच वेळी, कोलकाता ११ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध घरच्या मैदानावर आयपीएलचा साठावा सामना खेळताना दिसणार आहे.

             विजयासाठीच्या २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. वीस धावांवर त्यांना पहिला धक्का बसला.    प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या अर्शीन कुलकर्णीला मिचेल स्टार्कने बाद केले. त्याला केवळ नऊ धावा करता आल्या. दुसरा धक्का के एल राहुलच्या रूपाने बसला, तो २५ धावा करून परतला.  या सामन्यात मार्कस स्टॉइनिस शिवाय एकही फलंदाज जबाबदारीने खेळला नाही. त्याने चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. कोलकात्याविरुद्ध दिपक हुडाने पाच,  निकोलस पुरन १०, आयुष बदानी १५, टर्नर १६, कृणाल पांड्या पाच, युधवीर सिंग सात, रवी बिश्नोईने दोन धावा केल्या. तर नवीन-उल-हक एकही धाव न काढता नाबाद राहिला. कोलकाताकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी तीन बळी घेतले.  याशिवाय रसेलला दोन आणि मिचेल स्टार्क आणि सुनील नारायण यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

              नाणेफेक गमावल्या प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ६ गडी गमावून २३५ धावा केल्या. या मैदानावरील टि-२० मधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. या सामन्यात केकेआरने दमदार सुरुवात केली. सुनील नारायण आणि फिल सॉल्ट यांच्यात पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी झाली, नवीन-उल-हकने मोडीत काढली. त्याने सॉल्टला ३२ धावांवर बाद केले, तर नारायणने ८१ धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि सात षटकार बरसले. रवी बिश्नोईने त्याला आपला बळी बनवले.  तिसरा धक्का आंद्रे रसेलच्या  नवीन-उल-हकने त्याची शिकार केली. त्याने केवळ बारा धावा केल्या. त्यानंतर युधवीर सिंगने अंगकृष रघुवंशी यांच्यावर निशाणा साधला. तो २६ चेंडूत ३२ धावांची खेळी खेळून परतला. या सामन्यात रिंकू सिंगने १६, श्रेयस अय्यर २३, रमणदीप सिंग २५ आणि व्यंकटेश अय्यरने एक धाव काढली. रमणदीप आणि व्यंकटेश नाबाद राहिले. लखनौकडून नवीन-उल-हकने तीन बळी घेतले. तर यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि युधवीर सिंग यांना प्रत्येकी एक यश मिळाले. लखनौची प्ले ऑफ आता रामभरोसे बनली असून केकेआरने या विजयासह प्ले ऑफकडे दमदार पाऊल टाकले असून संभावित विजेत्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. जसजसी आयपीएल शेवटाकडे जाईल विजेता कोण ठरेल याची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहचेल.

COMMENTS