Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांना धमकी देणारा किंचक नवलेला अटक

न्यायालयाने सुनावली 7 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई ः एका युट्यूब चॅनेलवर तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण संपवतो, देवेंद्र फडणवीसांना ठार करतो म्हणत धमकी देणारा किंचक नवले याला अटक करण्यात आली आहे

’काश्मीर फाईल्स’ला परवानगी नको होती : शरद पवार
खडसे आणि राजू शेट्टी यांची नावे वगळली ?; विधान परिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीचा पेच कायम
विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखांचं शैक्षणिक कर्ज

मुंबई ः एका युट्यूब चॅनेलवर तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण संपवतो, देवेंद्र फडणवीसांना ठार करतो म्हणत धमकी देणारा किंचक नवले याला अटक करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी किंचक नवलेला अटक केली आहे. त्याला 7 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अत्यंत खालच्या भाषेत आणि प्रक्षोभक भाषेत किंचक नवलेने टीका केली. प्रक्षोभक भाषेत वक्तव्य करतानाचा किंचक नवलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच प्रकरणात किंचक नवलेला अटक करण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किंचक नवलेचा शोध घेण्यात येत होता. तो वेशांतर करुन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. आता सातारा गुन्हे शाखेच्या मदतीने मुंबईतल्या सांताक्रूझ पोलिसांनी त्याला सातारा येथील बाजार या ठिकाणाहून अटक केली. याआधी योगेश सावंत यालाही अटक करण्यात आली आहे. आता पोलीस या त्याचा तपास करत आहेत.

COMMENTS