Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याणमध्ये क्लासहून घरी परतणार्‍या तरुणीची हत्या

मुंबई : कोचिंग क्लासहून घरी येत असलेल्या तरुणीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण शहरातील

कर्जत तालुक्यात डोक्यात दगड घालून खून
दारू पिऊन मारहाण करत असल्यामुळे पतीची हत्या.
झोपेतच पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःलाही संपवलं

मुंबई : कोचिंग क्लासहून घरी येत असलेल्या तरुणीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण शहरातील तिसगाव भागात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

आदित्य कांबळे असे आरोपीचे नाव असून तो कल्याणचाच रहिवासी असल्याची माहिती आहे. आदित्यने तरुणीची हत्या का केली?, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कल्याणमधील दुर्गा देवी सोसायटीच्या आवारात ही घटना घडली आहे. त्यामुळे आता शहरात खळबळ उडाली असून या घटनेवरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरातील दुर्गा देवी सोसायटीत राहणारी तरुणी कोचिंगहून घरी येत होती. त्याचवेळी आरोपी आदित्य कांबळे याने तरुणीवर जीवघेणा हल्ला चढवला. आदित्यने तरुणीच्या डोक्यावर, छातीवर आणि मानेवर चाकुने सपासप वार केले. तरुणीने आरडाओरड करताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडून तरुणीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आल्याचे म्हटले आहे. आरोपी आदित्य कांबळे हा कालपासून दुर्गा दर्शन सोसायटीतील लोकांकडून मृत तरुणीविषयीची माहिती घेत होता. त्यावेळी तो कशासाठी माहिती विचारतोय, हे रहिवाशांना समजले नाही. परंतु मुलगी कोचिंगला गेली असता आरोपी सोसायटी परिसरात दबा धरुन बसलेला होता. तरुणीवर चाकुने सपासप वार करत आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणीचा आवाज ऐकून धावत आलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी आदित्य कांबळेवर हत्येच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS