केज प्रतिनिधी - आई-वडील बाहेरगावी गेले असल्याने अल्पवयीन मुलीला आई वडिलांकडे नेऊन सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून अपहरण केले. या प्रकरणी तिघांव
केज प्रतिनिधी – आई-वडील बाहेरगावी गेले असल्याने अल्पवयीन मुलीला आई वडिलांकडे नेऊन सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून अपहरण केले. या प्रकरणी तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
केज तालुक्यातील एका गावातील पती-पत्नी अल्पवयीन मुलगी व मुलाला घरी ठेवून धाराशिव, जिल्ह्यातील कळंब येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेले. एक दिवस मुक्कामी राहून ते दोघे परत गावी आले. यावेळी त्यांना त्यांची मुलगी घरी आढळून आली नाही. त्यांनी मुलाकडे चौकशी केली असता मुलाने सांगितले की, बहिणीला गावातील सतीष दिलीप खंडागळे हा दुचाकीवर घेऊन गेला आहे. त्याच्या सोबत प्रकाश दिलीप खंडागळे व मनोहर भांगे हे दोघे होते. अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. म्हणून ( दि. 28 ) आईच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात सतीष दिलीप खंडागळे, प्रकाश दिलीप खंडागळे व मनोहर भांगे या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. 183/2023 भा. दं. वि. 363 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.
COMMENTS