Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोजक्या मानकर्‍यांच्या उपस्थिती पाल येथे खंडोबा यात्रा

कराड / प्रतिनिधी : महाराष्ट्र कर्नाटकमधील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणार्‍या कराड पालच्या खंडोबा देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. खंडोबाची

गुटखा बंदी नावालाच; पाटण शहरात खुलेआम विक्री
साकुर्डीत वीज कोसळल्याने ट्रान्सफर्मरसह पिंपळाचे झाड जळाले
ग्रामीण भागाचा विकास झाल्यास जिल्ह्यासह राज्याचा विकास : ना. शंभूराज देसाई

कराड / प्रतिनिधी : महाराष्ट्र कर्नाटकमधील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणार्‍या कराड पालच्या खंडोबा देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. खंडोबाची यात्रा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आली असून मोजक्या 50 मानकर्‍यांच्या उपस्थितीत देवाचे यात्रेचे धार्मिक विधी करण्यात आले. पाल गावात 144 कलम लागू करण्यात आले असून बाहेरील लोकांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आज पाल या गावात 10 अधिकारी आणि 69 पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी सांगितले.
कराड तालुक्यातील पाल येथे आज खंडोबा देवाच्या यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. आज शनिवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी गावात पाहणी केली. तसेच पाल गावात येणार्‍या मुख्य मार्गावरील काशिळ, तारळे, इंदोली यासह प्रमुख मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच ठिकठिकाणी पाल गावात येणार्‍यांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाल गावात खंडोबा देवाची यात्रा रद्द झाल्याने गावात शुकशुकाट जाणवत होता. दरवर्षी येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भक्तांच्या उपस्थितीत पार पडते. मात्र, यंदा सलग दुसर्‍या वर्षी यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने पोलीस बंदोबस्तात मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत पार पडत आहे. श्री क्षेत्र खंडोबा पाल यात्रा सोहळा आज दि. 15/01/2022 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून लाईव्ह दर्शनासाठी युट्यूब व फेसबुकवर दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

COMMENTS