करुणा धनंजय मुंडे यांनी केली नव्या शिवशक्ती पक्षाची घोषणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करुणा धनंजय मुंडे यांनी केली नव्या शिवशक्ती पक्षाची घोषणा

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी गुरुवारी नगरमध्ये नव्या शिवशक्ती पक्ष स्थापनेची

भाजपच्या सोशल मीडियाप्रमुखाला मारहाण
दोन महिन्यांपासून पसार असलेला आरोपी जेरबंद 
वृंदावन यात्रेची काल्याच्या कीर्तनाने सांगता

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी गुरुवारी नगरमध्ये नव्या शिवशक्ती पक्ष स्थापनेची घोषणा केली. शिवशक्ती असे त्यांच्या या नव्या पक्षाचे नाव आहे, नव्या वर्षात जानेवारी अखेरीस नगरमध्येच 1 लाखाचा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह व झेंडा जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मी नेतृत्व करणार आहे, पण सामाजिक काम करणारांना नेते करणार आहे, पण गरज पडली व वेळ आली तर मी मैदानात उतरेल व परळीमध्ये धनंजय मुंडे विरोधात निवडणूक लढवेल, असेही त्यांनी जाहीर केले.

राज्यामध्ये सर्वकाही अंधार आहे, भ्रष्टाचार चालू, महिलांवर अत्याचार चालू आहे हे सर्व दूर करण्यासाठी व आता महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आपण गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहून त्यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी शिवशक्ती पक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची घोषणा करुणा धनंजय मुंडे यांनी आज नगरचे पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी भरत भोसले, मुरलीधर धात्रक,  रवी गवळी, दादा साहेब जावळे, भाऊसाहेब शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. करुणा मुंडे म्हणाले की आज सर्वत्र भ्रष्टाचार फोफावत चाललेला आहे, कोट्यवधी रुपयांचे घोटाळे घातलेले आहेत. मी गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारण बघत आहे. आज मी एका मंत्र्याची पत्नी आहे मात्र माझ्यावर सुद्धा मोठे संकट उभे राहिले. मला जेलमध्ये घातले गेले व माझ्यावर आज अनेक निर्बंध लादले गेले. मी जे काही पंचवीस वर्षांमध्ये पाहीले आहे, ते पाहिल्यानंतर आपण आता समाजासाठी देणे लागतो या भावनेतून मी आता समाजसेवेच्या माध्यमातून काम करण्याचा वसा घेतलेला आहे व एक वर्षापासून त्याची अंमलबजावणी सुरू केलेले आहे. ज्या स्वयंसेवी संस्था आहेत व जे सामाजिक काम करतात त्यांनी सुद्धा आता माझ्या बरोबरीने काम करावं असे मी आवाहन करत आहे. आता जो काही भ्रष्टाचार सर्वत्र होत चालला आहे त्याकरता आपल्याला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करायचे आहे त्या उद्देशाने मी शिवशक्ती सेना पक्षाची स्थापना करणार असल्याचेही करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS