मुंबई ः कार्तिका महापुजेला उपमुख्यमंत्र्यांना होणारा विरोध आणि त्यातच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला बोलवायचे असा पेच मंदिर समितीसमोर उभा असत
मुंबई ः कार्तिका महापुजेला उपमुख्यमंत्र्यांना होणारा विरोध आणि त्यातच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला बोलवायचे असा पेच मंदिर समितीसमोर उभा असतांना, कार्तिकी महापूजा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते व्हावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी ही मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कार्तिकीची विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. यावेळी मात्र दोन उपमुख्यमंत्री असल्याने महापूजेला कोणाला निमंत्रण द्यायचे असा पेच मंदिर समितीपुढे झाला आहे. अशातच सकल मराठा समाजाने मात्र उपमुख्यमंत्र्यांचा हस्ते करण्यात येणार्या शासकीय महापूजेला विरोध केला आहे. महापूजेचा पेच सोडविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ही महापूजा करावी अशी मागणी पुढे आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी ही मागणी केली आहे. यावर आता मंदिर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यात दोन दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकी महापुजेला कोण येणार याबद्दल आता चर्चा रंगल्या आहेत. यामध्ये अजित पवार यांचे नाव आघाडीवर आहे. यंदाच्या कार्तिकी महापुजेला उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु याबाबतीत मंदिर प्रशासनाने अद्याप कोणताही खुलासा किंवा स्पष्टीकरण दिले नाही.
COMMENTS