Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आव्हाड महाविद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात

पाथर्डी ः बाबुजी आव्हाड महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांकडून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राष्ट्रीय छात्र सेनेत

पाथरवट समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. अनिकेत गगे
नगर शहरात शिवसेनेचा आमदार करणारच : भाऊ कोरगावकर
देवळाली प्रवरात साई भक्तां कडुन धिरेंद्र शास्ञीच्या तैलचिञाची होळी  

पाथर्डी ः बाबुजी आव्हाड महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांकडून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रांनी विजय रॅली काढून युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण केली. यावेळी छात्रांनी दिलेल्या घोषणांनी महाविद्यालय परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.
आदरांजली अर्पण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे म्हणाले, कारगिल विजय दिवस 1999 मध्ये कारगिल जिल्ह्यात पर्वत क्षेत्रावर भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावत भारताचा विजय साजरा केला. दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल युद्धातील वीरांच्या स्मरणार्थ हा दिवस भारतभर साजरा केला जातो. या युद्धात भारतीय सैन्याचे सुमारे 500 हून अधिक जवान शहीद झाले पण अखेरच्या श्‍वासापर्यंत धैर्याने लढा देत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याने कारगिल युद्ध जिंकले. म्हणून हा दिवस भारतभर शौर्य दिवस व बलिदान दिवस म्हणूनही ओळखला जातो असे ते शेवटी म्हणाले.यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रांनी महाविद्यालय परिसरामध्ये श्रमदान ही केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे, एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ.अजय कुमार पालवे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ड सुरेशराव आव्हाड,17 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष, लेफ्टनंट कर्नल रणदीप सिंग, सुभेदार मेजर लोकेंद्र सिंग, सुभेदार बाळासाहेब कचरे आदींनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.

COMMENTS