Homeताज्या बातम्यामनोरंजन

करण कुंद्रा – तेजस्वी प्रकाशने गुपचूप उरकलं लग्न?

मुंबई प्रतिनिधी - करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही सुंदर नेहमीच चर्चेत असते. या दोघांच्या प्रेमकथेची सुरुवात बिग बॉस 15 मध्ये झाली. या दोघांच्य

मल्लिकार्जुन खर्गेंनी व्यक्त केली दिलगिरी
डोक्यात दगड घालून मित्राच्या मदतीने खून | LokNews24
‘अवतार २’ पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई प्रतिनिधी – करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही सुंदर नेहमीच चर्चेत असते. या दोघांच्या प्रेमकथेची सुरुवात बिग बॉस 15 मध्ये झाली. या दोघांच्या मैत्रीला प्रेमात बदलतांचा प्रवास अनेकांनी पहिला आहे. करण आणि तेजस्वी यांना एकत्र पाहणं प्रेक्षकांना देखील खूप आवडतं. अनेकदा या दोघांना त्यांच्या लग्नाविषयी विचारण्यात आले आहे. पुन्हा एकदा त्याच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला आहे.

अलीकडच्या करण आणि तेजस्वी प्रकाश यांचे लग्न झाले आहे, अशी चर्चा सुरू आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी अलीकडेच मुंबईतील इस्रायलचे दूत कोबी शोशानी यांची भेट घेतली. कॉन्सुल जनरलने तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र, त्याच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इस्रायली दूतांनी तेजस्वीला करणची spouse (पत्नी)’ असे म्हटले आहे. त्यांनी दोघांसोबतचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “करण कुंद्रा हा प्रिय अभिनेता आहे आणि एक सज्जन माणूस देखील आहे. त्याची जोडीदार तेजस्वी प्रकाशला भेटून खूप आनंद झाला.”करणने पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले आहे, “आम्हाला तुमच्या घरी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला आमच्या घरी आल्यासारखे वाटले.”तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचे फोटो आणि कॅप्शन पाहून चाहते वेडे झाले आणि फोटोवर कमेंट करू लागले. तेजस्वी आणि करण विवाहित आहेत हे जाणून त्यांना आनंद झाला. 

COMMENTS