मुंबई प्रतिनिधी - ‘द ट्रायल’ मुळे चर्चेत आलेल्या काजोलने नुकताच सोशल मीडियावर एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्या विधानामुळे अभिनेत्री तुफान चर
मुंबई प्रतिनिधी – ‘द ट्रायल’ मुळे चर्चेत आलेल्या काजोलने नुकताच सोशल मीडियावर एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्या विधानामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली. अभिनेत्रीबद्दल ओळख सांगायची तर, ती आपल्या चाहत्यांमध्ये अभिनयाकरिता तर ओळखली जातेच पण, ती आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि आपल्या परखड मतासाठी देखील अभिनेत्री ओळखली जाते. पण यावेळी, अभिनेत्रीने तिच्या एका वक्तव्यात देशातील नेत्यांना अशिक्षित म्हटले आहे, ज्यावरून एकच खळबळ उडाली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या कमेंटमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. नुकतंच तिने ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. दरम्यान, काजोल ‘द ट्रायल’या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर डेब्यू करणार आहे. वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री सध्या बरीच व्यग्र असून तिने मुलाखतीत देशातील राजकारण्यांच्या शिक्षणाबद्दल भाष्य केलं आहे. ‘द क्विंट’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने, देशातील नेत्यांचे शिक्षण आणि त्यांच्या दुरदृष्टीवर भाष्य केले आहे. तिच्या या विधानामुळे सोशल मीडियावर नेटकरी कमालीचे संतापले आहेत. पण नंतर काजोलने आपलं हे विधान मागं घेतलं आहे. मला कोणत्याही राजकीय नेत्याचा अपमान हेतू नव्हता. सोबतच आपल्या देशात अनेक चांगले राजकीय नेते आहेत जे देशाला योग्य मार्गानं नेत आहेत, असं म्हणत तिने यु- टर्न घेतला.
COMMENTS