मंत्रिमंडळ विस्ताराला न्यायालयीन प्रक्रियेचा अडसर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्रिमंडळ विस्ताराला न्यायालयीन प्रक्रियेचा अडसर

न्यायालयाच्या निर्णयानंतरच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सत्तांतर होऊन तब्बल 1 महिन्याचा कालावधी उलटत आला असला तरी, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आ

चिखलीच्या पोलीस उपनिरीक्षकाला का अटक झाली? पहा ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24
टेंभी नाक्यावर अवतरले धर्मवीर आनंद दिघे
धर्म काय कामाचा ?

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सत्तांतर होऊन तब्बल 1 महिन्याचा कालावधी उलटत आला असला तरी, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच राज्याचा गाडा हाकतांना दिसून येत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराअभावी विधीमंडळाचे अधिवेशन देखील पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास दिल्लीतील नेते अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारास दिल्लीतून हिरवा कंदिल अद्याप मिळालेला नाही. यामुळे विस्तार जुलै अखेर ही होणार का? यावर प्रश्‍न चिन्ह उपस्थितीत झाले आहे. न्यायालयांनी प्रक्रिया स्पष्टता अधिक झाल्यावर विस्तार करावा असे मत दिल्ली भाजपा नेत्यांचे आहे. न्यायालयाकडून स्पष्टता आल्यानंतरच विस्ताराचा मुहूर्त निघू शकतो असे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप हायकमांडकडून राज्यातील काही वरिष्ठ भाजप नेत्यांच्या नावाला विरोध असल्याची माहिती मिळत आहे. अपात्रत्रेसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची 1 ऑगस्ट सुनावणी आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करावा असे मत दिल्लीतील भाजप हायकमांडचे आहे. दिल्लीतील भाजप हायकमांडला राज्यातील मंत्रीमंडळात काही भाजपनेत्यांची नावं नकोत. तर प्रदेश भाजप वरिष्ठांकडून राज्यातील काही वरिष्ठ भाजप नेत्यांना मंत्रीमंडळात घेण्याचा आग्रह आहे. पण राज्यातील राजकीय – सामाजिक-जातीय गणित पाहता विचार करून भूमिका घ्यावी असा आग्रह राज्यातील भाजपा नेत्यांचा आहे. राज्यातील वरिष्ठ भाजपा नेत्यांमध्येही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत धाकधूक आहे. काही भाजपा वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत अमित शाहा, जे पी नड्डा यांच्याही भेटी घेतल्या आहे. राज्यातील विस्तार रखडत असल्याने इच्छुकांची घालमेल वाढत आहे.

राज्यात सत्ता परिर्वतन झाल्यास नवल नको ः संजय राऊत
’’उद्या महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन झाले तर यात आश्‍चर्य वाटून घेऊ नका. शिंदे गटातील काही आमदार अस्वस्थ आहेत, त्यांना फसवले गेले. तेच आमदार आता आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ असेल.’’ असा विश्‍वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते.राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात खूप गोंधळ आहे शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री स्वतःला म्हणत असतील तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जाण्याची गरज नसते. अमित शहासुद्धा मातोश्रीवर येत होते ते एक तेव्हाचे नाते होते. पण पाचवेळा मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जावे लागते ते त्यांचे बस्तान मुंबईत हलवतात की काय अशी स्थिती आहे.

COMMENTS