Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार अनिल घोरड यांना मारहाण

बीड प्रतिनिधी - बीड शहरातील सम्राट चौकातुन दुचाकीवरून जात असतांना पत्रकार अनिल घोरड यांना अडवुन तीन जणांनी विटाने जबर   मारहाण  करून डोके फोडल्य

वोट बँक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांचा बळी ः अजित नवले
आता आपल्या श्‍वासाची तरी कुणी द्यावी हमी…
चंदगड : चंदगड तालुक्यात स्वच्छतारूपी गांधी जयंती साजरी (Video)

बीड प्रतिनिधी – बीड शहरातील सम्राट चौकातुन दुचाकीवरून जात असतांना पत्रकार अनिल घोरड यांना अडवुन तीन जणांनी विटाने जबर   मारहाण  करून डोके फोडल्याची घटना बुधवार 12 एप्रील रोजी दुपारी दोन वाजता घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड येथील साप्ताहिक रयत क्रांतीचे पत्रकार अनिल घोरड  रा.स्वराज्यनगर हे 12 एप्रील 2023 रोजी दुपारी दोन वाजता  बीड शहरातील सम्राट चौका जवळुन जात असतांना या ठिकाणी आलेल्या आरोपी गजानन हावळे, अशोक कदम यांच्यासह सुर्‍या या तिघांनी संगणमत करून घोरड यांना मारहाण करून जखमी केले. यावेळी गजानन हावळे याने आम्ही पत्रकारांना अजीबात ओळखत नाहीत असे म्हणून विट हाती घेवुन घोरड यांना मारहाण करून त्यांचे डोके फोडले.  जखमी झाल्यानंतर बेशुध्द अवस्थेत रस्त्यावर पडलेले अनिल घोरड यांना बबलु जाधव, गणेश ढगे  यांनी तातडीने बीड जिल्हा रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पत्रकार अनिल घोरड यांचा बीड जिल्हा सामान्य रूग्णालयातील पोलिसांनी एमएलसी  जवाब घेवुन कागदपत्रे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून पोलिसांनी आरोपी गजानन हावळे, अशोक कदम यांच्यासह सुर्‍या यांच्या विरूध्द भादंवी कल 324, 323, 504,503 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस जमादार फिरोज खान पठान,ज्ञानेश्वर मराडे हे  करत आहेत.

COMMENTS