Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीला 16 लाखांचा दंड

मुंबई : जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन (Johnson & Johnson) या कंपनीच्या बेबी पावडर प्रकरणानंतर आता ‘ओआरएसएल’ या उत्पादनाच्या जाहिरातीवरून अन्न व औषध प

कुंदन काळे यांच्या वतीने गरजु कुटुंबियांना शीरखुर्मा किट वाटप
आदिवासींचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
नेवाशात विजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यू

मुंबई : जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन (Johnson & Johnson) या कंपनीच्या बेबी पावडर प्रकरणानंतर आता ‘ओआरएसएल’ या उत्पादनाच्या जाहिरातीवरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कंपनीला 16 लाखांचा दंड सुनावला आहे. ओआरएसएल हे अन्न प्रकारात मोडत असूनही कंपनीकडून हे उत्पादन औषध असल्याची जाहिरात संकेतस्थळावर करण्यात आली आहे.
कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर त्यांच्या सर्व उत्पादनाची जाहिरात केली आहे. त्यानुसार कंपनीने जुलै 2021 मध्ये ओआरएसएल हे अन्न प्रकारात मोडत असतानाही त्याच्या चार सह उत्पादनांची जाहिरात औषधे असल्याप्रमाणे केली होती. हे अन्न पदार्थ विविध प्रकारच्या आजार कमी करण्यासाठी किंवा रोगांवर उपचार करण्यासाठी तसेच वैद्यकीय व्यावसायिकांच्या सल्ल्यानुसार घेण्याचे सांगून आणि त्यासंदर्भात वैद्यकीय दावे करून जाहिरातीमधून ग्राहकांची दिशाभूल केली होती. ग्राहकांची दिशाभूल करणार्‍या जाहिरातीची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई विभागाच्या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी अरिवद कांडेलकर यांनी कंपनीला नोटीस देऊन सखोल चौकशी केली. यामध्ये कंपनीकडून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नियम व नियमने 2011 चे कलम 53 चा भंग झाल्याचे लक्षात आल्यावर कांडेलकर यांनी हे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाशी संबंधित न्यायालयात सादर केले. प्रशासनाचे सहआयुक्त तथा न्यायनिर्णय अधिकारी शशिकांत केकरे यांनी संपूर्ण प्रकरणांची सुनावणी घेऊन दोन्ही बाजूंचा लेखी व तोंडी युक्तिवाद ऐकल्यानंतर कंपनीला प्रत्येक प्रकारानानिहाय प्रत्येकी रुपये 4 लाख रुपये असा सर्व प्रकरणात एकत्रित 16 लाखांचा दंड ठोठावला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) अश्‍विनी रांजणे यांनी दिली.

COMMENTS