अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई येथे शैक्षणिक वर्ष

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या पहिल्याच दिवशी शाळेत येणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ,पेन,मोतीचुर लाडु व शालेय मोफत पुस्तके देऊन करण्यात आले. शाळेच्या प्रवेश द्वारावर फुग्यांची कमान तयार करण्यात आली होती. येणार्या विद्यार्थी व पालकांचे फटाक्यांच्या अतिषबाजीत स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जि प केंद्र रविवार पेठचे केंद्रप्रमुख कापसे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मुख्याध्यापक सी.व्ही.गायकवाड यांनी त्यांच्यासह सर्व शिक्षक बंधु भगिनींना नवीन शैक्षणिक वर्षांच्या शुभेच्छा देऊन सर्वांचे पुष्पगुच्छ,पेन देऊन स्वागत केले. शाळेतील सहशिक्षक विनायक मुंजे सर,राजेश कांबळे , बालाजी अंबाड सर,श्रीमती वर्षा गुळवे मॅडम, बालासाहेब इंगळे . नानासाहेब गायके ,श्रीमती दीपमाला गजभिये मॅडम, रामचंद्र कागणे सर,शउशंकर शिनगारे सर,उदयकुमार पाळेकर सर,भगवंत पवार सर,श्रीमती मेघा अकोलकर मॅडम.विकास शिंदे सर,सतीश चव्हाण सह पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS