Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संस्थाचालकांनी बनावट दस्तऐवज करून दिल्या नोकर्‍या ?

खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेतील प्रकार

अहमदनगर/प्रतिनिधी ःश्रीरामपूर तालुक्यातील खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था अशोकनगर या संस्थेच्या सेक्रेटरी व संचालक मंडळाने शिक्षक सेवक य

आगाऊ पिकविमा भरपाई द्याः आ. काळे यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी
महिलेचा पाठलाग करून शिवीगाळ, गुन्हा दाखल
संगमनेरमध्ये बस व मोटर सायकलचा अपघात

अहमदनगर/प्रतिनिधी ःश्रीरामपूर तालुक्यातील खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था अशोकनगर या संस्थेच्या सेक्रेटरी व संचालक मंडळाने शिक्षक सेवक या पदावर पदभरतीस शासनाची बंदी असतांना देखील बनावट दस्तऐवज तयार करून सन 2019 मध्ये नियुक्ती केल्याचे दाखवून न्यायालयाची आणि शिक्षण विभागाची फसवणूक केल्याचा आरोप राम खाडे यांनी केला असून, याप्रकरणी संबधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात खाडे यांनी म्हटले आहे की, खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी व संचालक मंडळाने, श्रीमती थोरात व इतर काही कर्मचारी यांची प्रयोगशाळा सहाय्यक (शिक्षण सेवक) या पदावर पदभरतीस शासनाची बंदी असतांनाही बनावट दस्तऐवज तयार करुन शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सन 2019 ची नियुक्ती दाखवून न्यायालयाची व शिक्षण विभागाची फसवणुक केली आहे. सन 2019 ला श्रीमती थोरात या शिक्षण घेत होत्या. मग त्या नोकरीला कशा? थोरात यांचे वडील विजयराव थोरात हे या कालावधीत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर या कार्यालयात व सहाय्यक पदावर कार्यरत होते. त्यांनी बिगर दिनांक व आवक जावकला नोंद नसतांनाचा प्रस्ताव घेऊन स्वतः कार्यालयीन टिप्पणी सादर करुन माध्यमिक विभागातील काही अधिकारी यांना हाताशी धरुन सदरचा प्रस्ताव नाकारून घेतला व नंतर उच्च न्यायलायात याचिक क्र. 8039/2021 दि.22.09.2021 रोजी याचिका दाखल केली. त्यावर लगेच शिक्षणाधिकारी यांच्या वतीने  08.10.2021 रोजी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अशा प्रकारे संस्थेने संस्थेचे पदाधिकारी, संबंधीत कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी संगनमताने बनावट दस्तऐवज तयार करुन शासनाची व उच्च न्यायालयाची फसवणूक केल्यामुळे त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी खाडे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देखील खाडे यांनी दिला आहे.

COMMENTS