Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसींना फसवण्यासाठीच जरांगे-फडणवीसांचे भांडण

वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

मुंबई ः गेल्या काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांची भेट घेत त्या

लाचारी चळवळीला संपवण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर  
‘वंचित’ लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढणार
अध्यादेश कायदेशीर प्रक्रियेत अडकणार

मुंबई ः गेल्या काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांनी विधानसभेच्या सर्व जागा लढाव्यात असे आवाहन केले होते. त्यानंतर आता अ‍ॅड. आंबेडकरांनी जरांगे यांच्यावर गंभीर टीका करतांना म्हटले आहे की, ओबीसी समाजाला फसवण्यासाठी जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांचे भांडण सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
जरांगे सातत्याने फडणवीस यांच्यावर जहरी टीका करतांना दिसून येत आहे. मात्र  फडणवीस आणि जरांगे यांच्यातील भांडण हे एक नाटक आहे असा हल्लाबोल आंबेडकरांनी केला आहे. आंबेडकर यांची सध्या आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांची भूमिका मांडली. यावेळी बोलतांना आंबेडकर यांनी जरांगे आणि फडणवीसांच्या वादावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचं भांडण हे नकली आणि फसवे आहे. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे ओबीसींना असे वाटते की जरांगेंच्या विरोधात कोण, तर फडणवीस,  पण फडणवीस ज्या पक्षाचे आहेत, त्या भाजपकडून यासंदर्भात भूमिकाच घेतली जात नाही. त्यामुळे हे नकली भांडण आहे. ते ओबीसींना फसवण्यासाठी ठरवून भांडत आहेत, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.  ओबीसींमध्ये मराठ्यांना घुसवले जाऊ नये, ही आमची भूमिका आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यांना वेगळं ताट दिले पाहिजे. वेगवेगळ्या निकषांनुसार हे आरक्षण दिले जाऊ शकते, त्यात फक्त आर्थिक निकष हा मुद्दा नाही. ते निकष तुम्हाला ठरवावे लागतात, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

COMMENTS