मुंबई : भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याला गुरुवारी सकाळी आग लागली. कटक रेल्वे स्थानकात ही दुर्घटना घडली. भुवनेश्वर-हावडा जनश

मुंबई : भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याला गुरुवारी सकाळी आग लागली. कटक रेल्वे स्थानकात ही दुर्घटना घडली. भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याला गुरुवारी सकाळी आग लागली. कटक रेल्वे स्थानकात ही दुर्घटना घडली. रेल्वे अधिकार्यांनी ही माहिती दिली. रेल्वे अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कटक रेल्वे स्थानकात ही दुर्घटना घडली.
जनशताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याला आग लागली. ही आग किरकोळ होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कटक रेल्वे स्थानकात गुरुवारी सकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या डब्याला लागलेली आग तात्काळ आटोक्यात आणण्यात आली, असे रेल्वे अधिकार्यांनी सांगितले. एक्स्प्रेसच्या डब्याच्या खालील बाजूस आग लागली होती. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत होते. या घटनेनंतर खबरदारी म्हणून प्रवाशांना तात्काळ डब्यातून खाली उतरवण्यात आले. या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही, असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जनशताब्दी एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी भुवनेश्वर स्थानकातून रवाना झाली. ती कटक रेल्वे स्थानकात पोहोचली. तिथेच एक्स्प्रेसचे ब्रेक जाम झाले. एका डब्याच्या खालील बाजूस आग लागली. डब्याच्या खालील बाजूकडून धूर बाहेर निघत असल्याचे पाहून काही प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. सर्व प्रवासी तात्काळ डब्यातून खाली उतरू लागले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन कर्मचार्यांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले, असे अधिकार्यांनी सांगितले.
COMMENTS