Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांब्यात विरोधकांनी जल जीवन मिशनचे काम केले बंद

पुणतांबा प्रतिनिधी ः जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले जुन्या साठवण तलावाचे खोलीकरणाचे काम ग्रामसभा न घेता सुरू केल्यामुळे शनिवारी विरोधकांनी एकत्

अल्पवयीन मुलीस पळवून नेणारे गजाआड
LokNews24 l ‘टीव्हीपेक्षा तेज’ सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना अटक
कॅन्टोन्मेंटकडून स्थानिक वाहनांच्या टोल वसुलीने नाराजी

पुणतांबा प्रतिनिधी ः जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले जुन्या साठवण तलावाचे खोलीकरणाचे काम ग्रामसभा न घेता सुरू केल्यामुळे शनिवारी विरोधकांनी एकत्रित येऊन काम बंद पाडले. त्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत शंका असल्यामुळे येणार्‍या काळात याबाबत देखील मुद्दा गाजणार आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत 16 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून यात साडेतीन कोटी रुपये अंदाजाचे जुन्या साठवणतळाचे गाळ काढण्याचे काम गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू करण्यात आले. या कामाबाबत ग्रामस्थांच्या भावनेचा विचार न करता काम सुरू केल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. 16 कोटी रुपयांच्या कामाबाबत ग्रामसभा घेऊन माहिती द्यायला पाहिजे होती, त्या कामाचे इस्टिमेट काम काय होणार याची माहिती जनतेला देणे आवश्यक होते. मात्र ग्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांनी याबाबत ग्रामसभा न घेता काम सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष वाढणे विकास आघाडीचे धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जाऊन काम बंद पाडले. यावेळी साठवण तलावाच्या कामाची पाहणी केली. साठवण तलावाच्या गाळ काढण्याचे काम सुरू केल्याचे ठेकेदार खिसे सुरज घाडगे यांनी सांगितले. मात्र विरोधकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तलावाचे खोली करण्याचे काम किती फुटापर्यंत करणार याची माहिती सर्वांना पाहिजे. तलावातील दगड मुरूम माती याची विल्हेवाट कशी लावणार, याबाबत कोण माहिती देणार. आधी प्रश्‍नांची सरबत्ती करून जाधव व वाढणे यांनी संबंधित ठेकेदाराला विचारणा केली. यावेळी ठेकेदार घाडगे यांनी कामाची वर्क ऑर्डर असून त्यानुसार काम सुरू करण्यात आल्याचे सांगितले. तलावाचे खोली करण्याच्या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे इंजिनिअर यांनी ड्रॉइंग करून तो नकाशा आम्हाला देणार असल्याचे सांगितले. जुन्या साठवण तलावाची क्षमता 52 एम एल डी असल्याचे समजते, मात्र याबाबत तलाव 52 एमएलडी भरणार का तसेच 52 एमएलडीचेच काम खोलीकरणाचे होईल असे वर्क ऑर्डर मध्ये असल्याचे सांगितले.

COMMENTS