Homeताज्या बातम्यादेश

तीर्थक्षेत्र वाचवण्यासाठी जैन मुनींनी केला प्राणत्याग

जयपूर/वृत्तसंस्था ः झारखंड सरकारने जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला होता. त्याविरोधात देशभरात जैन समाजाने तीव्र आंंदोलन कर

सलमानकडे रिक्षा चालवण्याचं लायसन्स आहे का? | LOKNews24
पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार
राऊत दाम्पत्याच्या अमृतमहोत्सवाला हजारोंची गर्दी

जयपूर/वृत्तसंस्था ः झारखंड सरकारने जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला होता. त्याविरोधात देशभरात जैन समाजाने तीव्र आंंदोलन करून, आपली एकजूट दाखवून दिली आहे. त्याचप्रमाणे राजस्थान राज्यातील जयपूर येथे जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरला पर्यटनस्थळ बनविण्यास विरोध करणार्‍या जैन मुनी सुज्ञेयसागरजी महाराज यांनी मंगळवारी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.

झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात ते गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले होते. तर मंगळवारी त्यांनी प्राण त्यागले. जैन मुनी सुज्ञेयसागरजी महाराज गत 25 डिसेंबरपासून सांगानेर येथे आमरण उपोषणाला बसलेले होते. मंगळवारी सकाळी सांगानेर संघजी मंदिरापासून त्यांची डोल यात्रा काढण्यात आली. यावेळी आचार्य सुनील सागर यांच्यासह जैन समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जैन मुनींना जयपूरमध्येच समाधी दिली जाणार आहे. झारखंड सरकारने पारसनाथ टेकडीला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. याविरोधात जैन समाजाचे लोक देशभरात निदर्शने करत आहेत. पारसनाथ टेकडी सम्मेद शिखर म्हणून प्रसिद्ध आहे. जगभरातील जैन लोकांचे ते सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे. ऑल इंडिया जैन बँकर्स फोरमचे अध्यक्ष भागचंद्र जैन यांनी सांगितले की, मुनीश्रींनी सम्मेद शिखरला वाचविण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. सुज्ञेयसागरजी महाराज यांच्या पार्थिवावर जयपूरच्या सांगानेर येथील श्रमण संस्कृती संस्थेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. झारखंडमधील सम्मेद शिखरजी या जैन तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून झारखंड सरकारने घोषित केले. त्यानंतर संपूर्ण देशभरातील जैनसमाजबांधवांनी त्याला विरोध दर्शविला. तर हा विरोध दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रविवारी या मागणीसाठी देशभरात लोक रस्त्यावर उतरले होते

COMMENTS