Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय शाह होणार आयसीसीचे अध्यक्ष ?

मुंबई ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सलग तिसर्‍यांदा सचित असलेले जय शहा आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जय

ओळख लपवण्यासाठी जाळला श्रद्धाचा चेहरा
समृद्धी महामार्गाच्या गाडी ड्रायव्हरला मारहाण करून हत्या (Video)
ब्रिटनमधील सत्तांतराचा अन्वयार्थ

मुंबई ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सलग तिसर्‍यांदा सचित असलेले जय शहा आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जय शहा यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला आणि निवडणूक जिंकल्यास ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनतील.जय शाह यांनी आयसीसी अध्यक्षपदासाठी अर्ज केल्यास त्यांची नवीन अध्यक्षपदी बिनविरोध निवड होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र जय शाह यांनी याबाबत अजून कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही.
नोव्हेंबर 2024 मध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. सध्या, न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. जुलै महिन्यात कोलंबोमध्ये एक बैठक घेणार आहे, ज्यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली जाऊ शकते. जय शाह यांनी अद्याप या विषयावर आपले मौन तोडले नसले तरी आयसीसीच्या काही पद्धतींवर ते समाधानी नसल्याचे वृत्त आहे. वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये टी-20 विश्‍वचषक 2024 आयोजित करण्याबद्दल शाह देखील समाधानी नव्हते. त्यामुळे जय शहा आयसीसीचे सुत्रे हाती घेण्यास इच्छूक असून ते निवडणूक लढणार असल्याचे संकेत आहेत, मात्र जय शहा यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

COMMENTS