Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यात काँग्रेस कमिटीचा जय भारत सत्याग्रह

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देशाचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या कारवाईच्या निषेधाथर्र् जय भारत

अकोले येथे सर्वधर्मीय वधू-वर मेळावा उत्साहात
LokNews24 l लोक न्यूज २४ व लोकमंथनच्या तत्परतेने गुजरातमध्ये रोखला बालविवाह
सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देशाचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या कारवाईच्या निषेधाथर्र् जय भारत सत्याग्रह सभा महात्मा गांधी स्मारक कोपरगाव येथे घेण्यात आली. यावेळी कोपरगाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. सर्व उपस्थितांनी  राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा देत  भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला.यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षाताई रुपवते, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, शिवसेनेचे प्रमोद लभडे, शिवाजी ठाकरे, भरत मोरे, सनी वाघ आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.

COMMENTS