Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई आंदोलनामध्ये जय बाबाजी परिवार सहभागी होणार 

नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चा कमिटीने घेतले स्वामी शांतिगिरी बाबांची ओझर आश्रमात भेट

नाशिक प्रतिनिधी - मुंबई येथे मराठा आरक्षण लढा हा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाज एकत्रित लढत आहे.हा लढा जिंकण

रवी राणांना भेटल्यानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर
गड ठरवणं हे शेलार मामा शिवाय कोण ठरवू शकतं ?
राज्यमंत्री तनपुरेंसह मनपा आयुक्तांना खंडपीठाची नोटीस ; मनपा अभियंत्याला पाठीशी घालणे भोवणार?, 16 जुलैला सुनावणी

नाशिक प्रतिनिधी – मुंबई येथे मराठा आरक्षण लढा हा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाज एकत्रित लढत आहे.हा लढा जिंकण्यासाठी ऊर्जा व आशीर्वाद मिळावे म्हणून आज सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परम पूजनीय 1008 श्री स्वामी शांतिगिरी जी महाराज यांची भेट घेत दर्शन व आशीर्वाद घेण्यात आले. त्याचबरोबर जय बाबाजी परिवार या मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये मुंबई येथील आंदोलनात सहभागी व्हावा याबाबत बाबाजीं सोबत चर्चा करण्यात आली. बाबाजींनीही सांगितले आहे की ज्या ठिकाणी चांगलं काम होत असेल त्या ठिकाणी बाबाजींचे आशीर्वाद नेहमीच असतात व या लढ्यालाही जय बाबाजी परिवार संपूर्ण पणे सहकार्य करेल.चांगले कर्म करणाऱ्याला कधीही अपयश येत नाही ही लढाई नक्कीच न्यायिक मार्गाने असल्याने मराठा समाजाला न्याय मिळेल व जय बाबाजी परिवार या लढ्यात स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी होईल असे शुभाशीर्वाद उपस्थित शिष्टमंडळाला दिले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा मधील जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्या मुंबई येथील जेवणाची व्यवस्था जितकी शक्य होईल तितकी नाशिक जिल्ह्याच्या वतीने करण्यात येणार असल्याचे बाबाजींना सांगताच बाबाजींनीही सांगितले की आश्रमाच्या वतीने ही होईल तेवढी शक्य मदत या अन्नछत्रासाठी देण्यात येईल.आशीर्वादरुपी ही मदत आपल्या शिष्ठमंडळाने स्वीकारावी असे बाबाजींचे शिष्य श्री विष्णु महाराज सांगितले. लागलीच ही मदत पंचवटी येथील औदुंबर लॉन्स या ठिकाणी पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने बाबाजींचे आशीर्वाद घेऊन ऋण व्यक्त करण्यात आले. बाबाजींचे आशीर्वाद मिळाल्याने आता या लढ्याला बळ मिळाले असल्याचे उपस्थित शिष्टमंडळाने यावेळेस समाधान व्यक्त केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे सुनील भाऊ बागुल, चंद्रकांतजी बनकर साहेब, करण गायकर नानासाहेब बच्छाव,राजू देसले,योगेश नाटकर,सोमनाथ जाधव, वैभव दळवी,हर्षल पवार,विक्रांत देशमुख संदीप कुठे राम निकम,हार्दिक निगळ आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकल मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षन मिळावे यासाठी त्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विविध घटकांच्या गाठीभेटी घेऊन या मोर्चात सहभागी व्हावे व लढायला ताकद द्यावी यासाठी प्रयत्न करत असताना आज जय बाबाजी परिवाराचे सर्वेसर्वा स्वामी शांतिगिरी बाबांचे आशीर्वाद घेतले व बाबांना ही विनंती केले की आपले सर्व भक्त व अनुयायी या लढ्यामध्ये मराठा समाजा सोबत असावे यासाठी आपण सर्वांना सांगितले तर सकल मराठा समाजाला फार मोठी ताकद मिळेल आणि बाबाजींनीही ती मोठ्या मनाने मान्य करून सर्व जय बाबाजी परिवार या लढ्यात सर्व ताकदीनिशी सहभागी होईल असा शुभ आशीर्वाद दिला त्यामुळे आणखीच हा लढा लढण्यासाठी आम्हाला ताकद मिळाली.

COMMENTS