Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा जय बाबाजी परिवाराचा निर्धार 

लढायचं आणि जिंकायचं नारा देत देशभक्तीपर गीतांनी देशसेवेस प्रारंभ

नाशिक प्रतिनिधी - लढा राष्ट्रहिताचा,संकल्प शुद्ध राजकारणाचा असा विचार घेऊन येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजां

नाशिक ग्रामीण भागात शांतिगिरीजी महाराजांचा झंझावती प्रचार दौरा 
नाशिक शहर व सिन्नर येथे विविध ठिकाणी शिवजयंती निमित्त शांतिगिरीजी महाराजांनी केले शिवपूजन 
 लोकसभेसाठी शांतिगिरीजी महाराजांची यंत्रणा गतिमान 

नाशिक प्रतिनिधी – लढा राष्ट्रहिताचा,संकल्प शुद्ध राजकारणाचा असा विचार घेऊन येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांना देशसेवेसाठी विक्रमी मतांनी विजयी करायचे यासाठी ‘लढायचं आणि जिंकायचं ‘ असा निर्धार जय बाबाजी भक्त परिवाराच्या हजारो भविकांनी नाशिक येथील प्रचार नियोजन बैठकी प्रसंगी केला.

       जय बाबाजी भक्त परिवाराने  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक येथे रणशिंग फुकले. राजकारणाच्या  शुद्धीकरणासाठी देशसेवा कार्याचा आरंभ यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला. नाशिक येथील हनुमान वाडी परिसरातील श्रद्धा लॉन्स येथे निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्म पिठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणूक संदर्भात भक्त परिवारातील प्रमुख प्रतिनिधींची बैठक नुकतीच संपन्न झाली.यावेळी स्वतःच्या खर्चाने,घरचा जेवनाचा डबा घेऊन भगवा शर्ट,जय बाबाजी नावाची टोपी घालून एका ड्रेस कोड मध्ये हजारो भाविक बैठकीत सहभागी झाले होते. प्रसंगी  अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी बैठकीस उपस्थितीत हजारो भाविकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, भारत मातेला दुःख होईल असे राजकारण आता यापुढे बंद होणे अपेक्षित आहे.यासाठी ‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ या विचारातून  राजकारणाच्या शुद्धीकरणाचा आरंभ केला आहे.चांगल्या व्यक्तींनी राजकारणात यावे आणि भारत मातेची निष्काम सेवा घडवी हेच ध्येय जय बाबाजी भक्त परिवाराचे असणार आहे.नागरिकांनी देखील यापुढे जागृत  होऊन सत्पात्री मतदान करावे आणि देशभक्त व्हावे असेही यावेळी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज म्हणाले.नियोजन बैठकीस विविध जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थितीत होते.यावेळी  प्रवक्ते विष्णू महाराज व रामानंद महाराज यांनी  भक्त परिवाराच्या निष्काम कार्याची माहिती उपस्थितांना दिली.भक्त परिवार वेगळ्या पद्धतीने निवडणुक लढवणार असून मतदारांना  देशभक्तीसाठी सत्पात्री मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. व्यसनमुक्त समाज,सुसंस्कारीत पिढी,निस्वार्थ विकास व प्रदूषणमुक्त धारतीमाता यांसह विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी भक्त परिवार प्रयत्नशील रहाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या नियोजन बैठकी नंतर जय बाबाजी भक्त परिवारातील हजारो भाविक नियोजनबद्धरित्या आपल्याला मिळालेल्या भागातील प्रचारासाठी रवाना झाले. हे भाविक प्रचारा दरम्यान मतदारांबरोबरच आपल्या नातेवाईकांची देखील भेट घेऊन बाबाजींची राष्ट्रहितासाठीची भूमिका समजावून सांगणार आहे.नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या इतर उमेदवारांच्या गोटात शांतता दिसत असतांना  महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांची प्रचार यंत्रणा मात्र अधिकच गतिमान होतांना दिसत आहे.

COMMENTS