आमदारांनीच दिला महापालिकेत धरणे आंदोलन करण्याचा इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदारांनीच दिला महापालिकेत धरणे आंदोलन करण्याचा इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेत उपमहापौरपद व स्थायी समिती सभापतीपद अशी दोन महत्त्वाची सत्तापदे असतानाही राष्ट्रवादीचे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी

Ahmednagar : किरण काळे अदखलपात्र आहे तर जगतापांनी १ कोटीची नोटीस का पाठवली (Video)
पुस्तकरुपी असलेले ज्ञान समाजाला दिशा देतात -आ. संग्राम जगताप
खा. डॉ. विखेंनी दिली…शहर भाजपला चपराक

अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेत उपमहापौरपद व स्थायी समिती सभापतीपद अशी दोन महत्त्वाची सत्तापदे असतानाही राष्ट्रवादीचे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या दालनात येत्या आठ दिवसात धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नगरमध्ये तो चर्चेचा विषय झाला आहे. महापालिकेच्या विविध विभागात मानधन तत्वावर अभियंते व तांत्रिक पदे भरावीत व प्रशासकीय कामाला आणि नागरिकांच्या प्रश्‍नाला गती द्यावी अशी मागणी करताना आठ दिवसात त्याची पूर्तता झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी आयुक्त डॉ. जावळे यांना निवेदन देऊन दिला आहे.
आयुक्त डॉ. जावळे यांना उपमहापौर गणेश भोसले यांच्या पत्राद्वारे महापालिकेतर्फे विविध विभागात मानधन तत्वावर अभियंते व तांत्रिक पदे भरावी अशी मागणी आमदार जगताप यांनी केली. यावेळी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, निखिल वारे, प्रा. माणिकराव विधाते, अमोल गाडे, मोहन कदम, पारधे उपस्थित होते. नगर शहरात प्राथमिक सुविधा निर्माण करताना प्रशासन कुठे तरी कमी पडत आहे. प्रशासनातील बांधकाम, पाणीपुरवठा, इलेक्ट्रिक व नगररचना विभागात अभियंते व तत्सम तांत्रिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे मनपाच्या प्रशासकीय कामावर ताण पडतो आहे. संपूर्ण शहरासाठी फक्त दोनच अभियंते कार्यरत आहेत व ही लाजीरवाणी बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने मागील काही वर्षात कंत्राटी पध्दतीने म्हणजेच कंत्राटदारामार्फत अभियंते व इतर तांत्रिक कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. मात्र, कंत्राटदारा मार्फत भरलेले अभियंते निष्क्रिय दर्जाचे होते. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाला गती मिळाली नाही. त्या कर्मचार्‍यांवर कोणतीही जबाबदारी नसल्याने ते फक्त दिवस भरवायचे व निघून जायचे, असा दावा करून या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या कुठल्याही विकास कामांवर अभियंते दिसले नाही. त्यामुळे विकास कामांच्या दर्जावर त्याचा परिणाम झाला व महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले. या अभियंत्यांना कंत्राटदार तोकडा व कमी पगार देत असल्याने व तोही पगार वेळेवर न दिल्याने संबंधित कंत्राटी अभियंते मनापासून काम करीत नाहीत व जबाबदारीपासून पळून जात असत. त्यामुळे आज एकही कंत्राटी अभियंता व इतर तांत्रिक कर्मचारी मनपाकडे येण्यास तयार नाही. त्यामुळे कंत्राटी अभियंते व इतर तांत्रिक कर्मचारी मानधन तत्वावरच भरण्यात यावे व प्रशासनातील कामांना गती देण्याचे काम करावे. तातडीने आठ दिवसात ही मागणी मान्य करावी अन्यथा आपल्या कार्यालयात लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करु हा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

COMMENTS