Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दूध उत्पादनाचा खर्च कमी राखण्यात व शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यात होते मदत  

नाशिक: भारतातील सर्वात मोठ्या वैविध्यपूर्ण कृषी उद्योगांपैकी एक, गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेडने गोदरेज दौलत आणि गोदरेज धन लक्ष्मी ही दोन पशु आहार उत्प

राजेश टोपेंमुळे कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू
शाक्तपंथी छत्रपती संभाजी महाराज ! 
महाराष्ट्रात राज्य सहकारी बँक घोटाळ्याची ईडीकडून चौकशी

नाशिक: भारतातील सर्वात मोठ्या वैविध्यपूर्ण कृषी उद्योगांपैकी एक, गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेडने गोदरेज दौलत आणि गोदरेज धन लक्ष्मी ही दोन पशु आहार उत्पादने बाजारपेठेत दाखल केली आहेत. आधुनिक संशोधन व विकासातून तयार केलेली, विविध फील्ड ट्रायल्सनंतर सादर करण्यात आलेल्या नवीन कंपाउंड फीड सोल्युशन्समुळे पशूंची उत्पादनक्षमता व पुनरुत्पादक आरोग्य सुधारण्यात मदत करणारी उत्पादने सादर करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचा नफा देखील वाढेल.नवीन उत्पादने लॉन्च करण्यात आल्याबद्दल, गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेडचे ऍनिमल फीड बिझनेसचे सीईओ श्री. संदीप सिंग यांनी सांगितले, “कंपाउंड फीड हे केवळ खाद्य नाही तर भविष्यासाठी गुंतवणूक आहे. पशूंचे आरोग्य चांगले राहावे, दूध उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांना  लाभदायक  दुग्धशेती करता यावी यासाठी गोदरेज दौलत व गोदरेज धन लक्ष्मी सादर करून आम्ही शेतकऱ्यांना असा उपाय उपलब्ध करवून देऊ इच्छितो ज्यामुळे पशूंना सर्वात कमी खाद्य देऊन देखील सर्वात जास्त दुग्ध उत्पादन मिळवता येऊ शकेल.”त्यांनी पुढे सांगितले, “योग्य कंपाउंड फीड निवडून शेतकरी महत्वपूर्ण गुंतवणूक करत आहेत, जी पुढे दीर्घ काळापर्यंत त्यांना उपयोगी ठरणार आहे. आमच्या कंपाउंड फीड सोल्युशन्सच्या मदतीने शेतकऱ्यांना पारंपरिक खाद्य प्रकारांच्या ऐवजी हे प्रगत खाद्य निवडून अतुलनीय यश मिळवता येईल.”

COMMENTS