Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदींसाठी मणिपूर भारत नाही का ?

काँगे्रस नेते राहुल गांधींचा भाजपवर थेट हल्ला

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः लोकसभेतील अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा सुरू असून, त्यावर बुधवारी काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डा

काँग्रेसचे ’हाथ से हाथ जोडो’ अभियान
राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल
संगमनेरमध्ये खा. राहुल गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍यांचा निषेध

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः लोकसभेतील अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा सुरू असून, त्यावर बुधवारी काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागतांना म्हणाले की, मी काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो. आपले पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत कारण त्यांच्यासाठी मणिपूर भारत नाही का ? मी मणिपूर हा शब्द वापरला. मणिपूर उरले नाही हे आजचे वास्तव आहे. तुम्ही मणिपूरचे विभाजन केले, तोडले. मदत शिबिरात गेलो, महिलांशी बोललो, मुलांशी बोललो, पंतप्रधानांनी आजपर्यंत तसे केले नसल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.

यावेळी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या मित्रांनी आज घाबरू नये. मी आज अदानीवर बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला चिमटा काढला. तसेच आज मैं दिमाग से नहीं, दिल से बोलना चाहता हूँ, म्हणत सत्ताधार्‍यांना टोमणे हाणले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना राहुल गांधी म्हणाले की, सर्वप्रथम मी तुमचे आभार मानू इच्छितो की तुम्ही माझी खासदारकी बहाल केली. मागच्या वेळी मी बोललो तेव्हा मलाही काही वेदना झाल्या. अदानीजींवर इतके लक्ष केंद्रित केले की तुमच्या ज्येष्ठ नेत्याला थोडा त्रास झाला. घडलेल्या वेदनांचा कदाचित तुमच्यावरही परिणाम झाला असेल. याबद्दल मी माफी मागतो. मी फक्त सत्य सांगितले. आज भाजपचे माझे मित्र तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आज मी अदानीजींवर माझे भाषण करणार नाही. तुम्ही शांत राहू शकता. मी भाषणाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारत एक आवाज आहे. हा जनतेचा आवाज आहे, हृदयाचा आवाज आहे. तो आवाज तुम्ही मणिपूरमध्ये मारला, म्हणजे मणिपूरमध्ये तुम्ही भारत मातेची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, देशभक्त नाही. म्हणूनच तुमचे पंतप्रधान मणिपूरला जाऊ शकत नाहीत कारण त्यांनी मणिपूरमध्ये हिंदुस्थानची, भारतमातेची हत्या केली आहे. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, भारतमातेचे मारेकरी आहात. यावर सभापती बिर्ला म्हणाले, भारत माता आपली माता आहे, सभागृहात बोलताना शिष्टाई जपा. यावर राहुल म्हणाले- मी माझ्या आईबद्दल बोलतोय. मणिपूरमध्ये माझ्या आईची हत्या झाली. एक आई इथे बसली आहे, दुसरीची मणिपूरमध्ये हत्या केली. लष्कर तेथे एका दिवसात शांतता प्रस्थापित करू शकते. तुम्ही हे करत नाही कारण तुम्हाला भारतातील मणिपूरला मारायचे आहे. मोदीजी मणिपूरचा आवाज ऐकत नाहीत, त्यांच्या हृदयाचा आवाज ऐकत नाहीत, तर ते कोणाचे ऐकतात? ते कोणाचा आवाज ऐकतात, ते फक्त दोन लोकांचे आवाज ऐकतात. रावण दोन लोकांचे ऐकत होता- मेघनाथ आणि कुंभकर्ण. तसेच मोदीजी अमित शहा आणि अदानी यांचे ऐकतात असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी आपल्या 35 मिनिटांच्या भाषणात चढवला.

राहुल गांधींचे भाजप खासदारांना फ्लाइंग किस ः स्मृती इराणी – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्‍वास प्रस्तावावर भाषण करून सभागृह सोडले. यावेळी त्यांनी केलेल्या एका कृतीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रचंड संतापल्या असून राहुल गांधींना त्यांनी स्त्रीद्वेष्टा संबोधले आहे. राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला. हा महिलांचा अपमान आहे. महिला खासदारांचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणीच स्मृती ईराणी यांनी केली आहे. 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे धाव घेऊन तक्रारही केली आहे. राहुल गांधी हे लोकसभा परिसरातून बाहेर पडत असताना त्यांच्या काही फायली पडल्या. त्यामुळे या फाईली उचलण्यासाठी राहुल गांधी वाकले असता त्यांना पाहून भाजपचे खासदार हसायला लागले. त्यावर राहुल गांधी यांनी या हसणार्‍या खासदारांना फ्लाईंग किस दिला आणि तिथून हसत निघून गेले, असे काही लोकांचे म्हणणे आहे.

COMMENTS