Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात बाँम्बस्फोट घडवण्याची धमकी

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या ई-मेलवर देशात बॉम्बस्फोट होण्याच्या धमकीची कमेंट आल्याने एकच खळबळ

युतीनंतर…युतीतच मिळाली 25 वर्षांनी संधी
खाद्यतेलाच्या किंमती भडकल्याने सरकार चिंतेत ; आयातशुल्क कमी करण्याचा विचार; सामान्यांना वरण-भातही दुरापास्त
केंद्रीय मंत्री राणेंच्या फोटोवर जोड्यांचा प्रहार…;शहर शिवसेनेचे आंदोलन, गुन्हाही केला दाखल

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या ई-मेलवर देशात बॉम्बस्फोट होण्याच्या धमकीची कमेंट आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतात विविध ठिकाणी बाँम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देण्याची धमकी या कमेंटमधून देण्यात आली. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक व्यक्ती उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारासाठी आलेला व्यक्ती एक वेबसाईट चालवतो. या वेबसाईटवर देशात बॉम्बस्फोट होण्याच्या धमकीची कमेंट आल्याने एकच गोंधळ उडाला. या सगळ्या प्रकारानंतर ज्या व्यक्तीला हा मेसेज आला होता त्यांनी तात्काळ पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली. या व्यक्तीच्या तक्रारीवरुन अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.  ई-मेलनुसार, भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून हा ईमेल आला आहे. एम. ए. मोखीम असे धमकी देणार्‍या आरोपीचे नाव आहे. आरोपीने मेलमध्ये म्हटले आहे की, मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करतो. हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशात अनेक ठिकाणी अनेकांचे मृत्यू घडवून आणणार आहे. दरम्यान, ज्यांना हा धमकीचा मेल आला त्यांनी तातडीने पुणे शहर पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. पोलिसांनी याची तातडीने दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS