नाशिक : जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभागात अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात मॉडेल स्कू
नाशिक : जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभागात अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात मॉडेल स्कूल हा उपक्रमात राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या 649 शाळांमधील विद्यार्थ्यांशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संवाद साधला. यामध्ये अभ्यास कसा करावा? या विषयी शिक्षणतज्ञ सचिन जोशी,उद्योजक कसे बनावे? या विषयी अरविंद नारायणन व सुशिल मुणगेकर आणि Spelling Bee स्पर्धेबद्दल बद्दल रितू मुथा, ज्युड औगस्टीन यांनी मार्गदर्शन केले. मॉडेल स्कूल मधील सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना एकाच वेळी मॉडेल स्कूल संवाद कार्यक्रमात उपस्थित होते.
गेल्या वर्षीपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत मॉडेल स्कूल हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत मागील वर्षाच्या १२८ व यंदाच्या वर्षीच्या ५२१ एकूण ६४९ शाळांची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली असून भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीच्या पूर्वी सुट्टीसह विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी या मार्गदर्शनपर संवादाचे आयोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचं आहे त्यांची स्वप्न काय आहे, त्यासाठी त्यांना काय करावे लागेल हे विद्यार्थ्यांनी एका वहीत लिहून काढावे, जिल्हा परिषद हे मार्फत जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धा ही आयोजित केली जाते यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच उन्हाळ्याच्या सुट्टीत स्पेलिंग बी स्पर्धेची तयारी करावी शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, आगामी निवडणुकीत मतदार जनजागृतीसाठी शाळा स्तरावरती विविध उपक्रम राबवण्यात यावे अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केल्या.
शिक्षण तज्ञ सचिन जोशी यांनी मुलांना अभ्यास करताना चुका कशा टाळाव्यात यासाठी चुकांची वही बनवायला सांगितली आहे. या वहित मुलांनी केलेल्या चुका त्यांना लिहाव्यात. अभ्यास करून झाल्यावर त्यांचे ५ ते १० मिनिटे रिवीजन करावी,
पाठांतरावर भर न देता गोष्टी समजून मग त्यावर विचार करायला हवा असे सांगितले.
उद्योजक अरविंद नारायणन व सुशिल मुणगेकर यांनी मुलांना उद्योजक होण्यासाठी निरीक्षण,श्रवण,जिज्ञासूवृत्ती, सहानुभुती, निर्मिती, कल्पनाशक्ती या सहा गोष्टी आवश्यक आहे असे सांगत मुलांनी उद्योजक बनण्यासाठी कसा विचार करावा यावर वेगवेगळी उदाहरणे दिली. Spelling Bee या स्पर्धेत जास्तीत जास्त मुलांचा सहभाग कसा घेता येईल यावर रितू मुथा, ज्युड औगस्टीन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांच्यासह सर्व तालुक्यांचे गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
COMMENTS