जामखेड प्रतिनिधी - आरक्षणाबाबतची लाट धनगराच्या शेवटच्या लोकापर्यंत गेली तर कोणीच रोखु शकत नाही. मराठा धनगर लहान मोठा भाऊ मानत नाही.आपण एकच आहोत.
जामखेड प्रतिनिधी – आरक्षणाबाबतची लाट धनगराच्या शेवटच्या लोकापर्यंत गेली तर कोणीच रोखु शकत नाही. मराठा धनगर लहान मोठा भाऊ मानत नाही.आपण एकच आहोत. आरक्षण हे आपलं दूखणं एकच आहे. तुम्हाला तुमच्या लेकराबाळाच भविष्य चांगल करायच असेल तर पेटुन उठावा लागेल.आरक्षण लढा तीव्र करा मी तुमच्या ताकदीने पाठीशी आहे असे मनोज जरांगे यांनी सांगितले. यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे धनगर आरक्षणप्रश्री दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख अथिती मनोज जरांगे होते. यावेळी ते बोलत होते. माजीमंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास यंशवत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, आ. प्रा राम शिंदे, माजी आ. रामहरी रूपनवर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके, सामाजिक कार्यकर्त्या सुशिला मोराळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संभाजी शिंदे, डाॅ.शिवाजी राऊत, उज्वला हाके , उत्तम पडळकर, ॲड. दिलीप येडतकर,प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे ,उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर, सुरेश बंडगर, अक्षय शिंदे, नितीन धायगुडे,शांतीलाल कोपनर,प्रा शिवाजी बंडगर यांच्यासह मोठया संख्येने धनगर बांधव उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षण मिळेपर्यंत छाताडावर बसणार, पण आरक्षण सोडणार नाही. मी जातवान शेतक-याचा पोरगा आहे.आपल्या लेकराबावाला न्याय द्यायचा असेल,आरक्षण मिळवावेच लागेल. आपले बांधव द-या खो-यात मेंढर चारायची.आमच्या मराठा समाजाने काबाडकष्ट करायचे आणि मुल शिकवायची एवढेच आजपर्यंत केले. राजकारण डोक्यात ठेवुण काही केल तर आरक्षणच मिळणार नाही. जातीची गद्दारी करणारी माझी औलाद माझी नाही. मराठा आरक्षणप्रश्री समिती हैद्राबादला जाती आणि परत येते नेमका काय अभ्यास करती माहित नाही. सरकार दर चार दिवसाला पर्याय सांगा म्हणतय असे मनोज जरांगे म्हणाले. यावेळी माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले, माजी आ रामहरी रूपनवर, गणेश हाके ,सुरेश बंडगर, अण्णासाहेब रूपनवर यांचीही भाषणे झाली. प्रास्तविक नितीन धायगुडे यांनी केले.तर आभार किरण धालपे यांनी मानले.
आरक्षणाबाबत सरकारच्या हालचाली कमी : आ राम शिंदे – धनगरांना राज्यात एनटी,देशात ओबीसी आणि घटनेत एसटीमध्ये आरक्षण आहे. आरक्षणाच्या दृष्टीने सरकारकडून ज्या गतीने हालचाली करायला पाहिजे होत्या केल्या नसल्याने या मेळाव्याची गरज पडली. समाजाच्या हितासाठी धनगर सारा एक हा उद्देश ठेवुन आरक्षण उभे गेले तर नक्कीच यश मिळेल. समाजकारण आणि राजकारणात गल्लत झाली की गफलत होते. धनगर समाजात मनोज जरांगे पाटील का निर्माण होत नाही.अण्णा हजारे नंतर जर कोणाच्या आंदोलनाची देशात चर्चा झाली असेल, तर ते मनोज जरांगे पाटील आहेत.सत्तेला वाकावायची ताकद जरांगे पाटलांच्यामध्ये असल्याचे आ राम शिंदे यांनी सांगितले.
मध पँटर्न राबवु – : बाळासाहेब दोडतले – सरकारने दिलेल्या वेळेत आरक्षण अंमलबजावणी केली नाही तर.आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करणार आहे. ५० दिवसात आरक्षणाचा प्रश्र मार्गी लावला नाही. तर गाठ धनगरांशी आहे. अशा इशारा देत माळी,धनगर,वंजारी या पुर्वीच्या ‘ माधव ‘ पॅटर्नप्रमाणे आता म ध (मराठा – धनगर) पॅटर्न राज्यात राबवण्याचा निर्धार यशवंतसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी व्यक्त केला.
COMMENTS