पाथर्डी : शहरातील प्रभाग पाच मध्ये बऱ्याच भागात स्ट्रीट लाईट नसल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारमय परिस्थिती आहे. त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट

पाथर्डी : शहरातील प्रभाग पाच मध्ये बऱ्याच भागात स्ट्रीट लाईट नसल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारमय परिस्थिती आहे. त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसावाव्या अशी मागणी नगरसेवक अमोल गर्जे यांनी नगराध्यक्ष अभय आव्हाड व मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेवाळे गल्ली, लकार गल्ली, कासार गल्ली, मेनरोड, अष्टवाडा, रंगार गल्ली, जय भवानी चौक,सिनेमा गल्ली, येळाई गल्ली, जैन मंदीर गल्ली, पिनाकेश्वर मंदीर, खाटीक गल्ली, मंत्री गल्ली येथे स्ट्रीट लाईट मंजूर करण्यात यावेत. यावेळी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी
पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ. राजळे व नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या प्रयत्नाने निधी उपलब्ध झाला असून लवकरात लवकर संबंधित ठिकाणी स्ट्रीट बसवतील असे गर्जे यांना आश्वासन दिले आहे.

COMMENTS