Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आतापर्यंत दहा हजार वाहनांची तपासणी

पुणे : कसबा विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरारी पथक, नाका तपासणी पथकाकडून आतापर्यंत दहा हजार 668 वाहनांची तपा

नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
बँकांच्या शाखा आणि एटीएमचा विस्तार करा – केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड
डीएपी खतावरील अनुदानात भरीव वाढ

पुणे : कसबा विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरारी पथक, नाका तपासणी पथकाकडून आतापर्यंत दहा हजार 668 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याकरिता प्रशासनाने नियोजन केले आहे. आचारसंहितेचे पालन करण्याबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
प्रशासनाकडून कसब्यात नऊ तपासणी नाके, तसेच नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत संपूर्ण मतदारसंघात वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. तसेच भरारी पथकाकडून संपूर्ण प्रचार यंत्रणेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत भरारी आणि नाका तपासणीमध्ये दहा लाख 53 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले आहेत, तर 12 हजार 250 किमतीचे 231 लिटर मद्य हस्तगत करण्यात आले आहे. आचार संहितेचे पालन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे , अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.

COMMENTS