ब्राह्मणांना दुसरा देश कसा देणार ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

ब्राह्मणांना दुसरा देश कसा देणार ?

सध्या सोशल माध्यमांवरती एका बातमीची पोस्ट झपाट्याने व्हायरल झाली आहे. ती पोस्ट आहे मागील वर्षातील. म्हणजे, २१ एप्रिल २०२० मधील. बॉलिवूड चित्रपट निर्म

‘एमआयएम’ आणि आघाडीचा अन्वयार्थ
इंडिया आणि वास्तव
विरोधाभास आणि अर्थसंकल्प

सध्या सोशल माध्यमांवरती एका बातमीची पोस्ट झपाट्याने व्हायरल झाली आहे. ती पोस्ट आहे मागील वर्षातील. म्हणजे, २१ एप्रिल २०२० मधील. बॉलिवूड चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री यांची ती पोस्ट. विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘ब्राह्मणांना भारतातून हटवा, त्यांना वेगळा देश द्या, सर्वांना आनंद होईल’ या त्यांच्या वक्तव्यावरून मागच्या वर्षी देखील चांगलाच गदारोळ झाला होता. सध्या विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट वादात असला तरी देशभर चर्चेचा विषय आहे. यातच अग्निहोत्री यांनी मागील वर्षी व्यक्त केलेले म्हणणे प्रत्यक्षात खरे होऊ शकते का? किंबहुना तसे करणे योग्य आहे का? आणि असे का करायचे? याचा उहापोह करणे क्रमप्राप्त.

ब्राह्मणांबद्दल लोकांच्या मनात एवढा द्वेष का? आणि तो दिवसोंदिवस का वाढतोय? तर त्याला कारणही ब्राह्मणच आहेत. आज मितीला चांगले ब्राम्हण देखील आपल्या देशात आहेत हे कुणालाही नाकारता येणारे नाही. पण सर्वच  ब्राम्हण विज्ञानवादी आणि मानवतावादी नाहीत हेही खरे. भारतात ब्राह्मणांमुळे विषमतावादी मूल्याची प्रस्थापना झाली. वर्णाधारित जाती-धर्म भेदभावाचे खापर ब्राम्हणांच्या नावे फोडले जाते हे खरे आणि त्याला आधार देखील आहे. चातुर्वर्ण्य म्हणजे चार वर्ण. ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र. ब्राह्मण सर्वांत उच्च. त्याच्या खालोखाल क्षत्रिय. क्षत्रियाच्या खालोखाल वैश्य व वैश्याच्या खाली शुद्र, असा हा उच्चनीच भाव धर्मशास्त्राने गृहीत धरला आहे. हे झाले सवर्णांचे. त्यात अवर्णांचा विषय वेगळा. अवर्णांमध्ये येतात ते, आदिवाशी, भटक्या जाती- जमाती आणि अस्पृश्य. एका माणसाने दुसऱ्या माणसाला स्पर्श न करणे म्हणजेच अस्पृश्यता. जातीय अस्पृश्यता हा प्रकार भारतात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. जातीय अस्पृश्यतेच्या नियमांनुसार कनिष्ठ जातीतील लोक हे उच्च जातीतील लोकांना स्पर्श करू शकत नाहीत. पेशवाईच्या काळात भारतात अस्पृश्यतेला अमानवी स्वरूप आले होते. अस्पृश्यतेचा उगम मनुस्मृती या ग्रंथातून झाल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाचा पहिला सुपुत्र मनू याने हा ग्रंथ लिहिला असून प्राचीन हिंदू धर्मशास्त्रत त्याला मान्यता आहे. हा विषमतावादी ग्रंथ घटनाकाराने जाळून टाकला होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेला अमानवी स्वरूप आले होते हेही खरे. पण कोरेगाव भिमामध्ये अस्पृश्यांनी पेशव्यांचा नायनाट केला. असे झाले असले तरी विषमतावादाचा नायनाट नक्कीच झाला नाही. आजही विषमता आहे ती ब्राह्मणांमुळेच. पण ब्राम्हण हे मूळ भारतातील नाहीत हे खरे असल्यामुळे आणि त्यांच्यामुळेच भारतातील सर्व समस्या असल्यामुळे ‘ब्राह्मणांना भारतातून हटवा, त्यांना वेगळा देश द्या, सर्वांना आनंद होईल’ असे विधान चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री यांनी मागील वर्षी केले होते. हे खरे असले तरी विवेक अग्निहोत्री हे सुद्धा एक ब्राम्हण आहेत. त्यांची पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी हि सुद्धा एक प्रसिद्ध नटी आहे. जोशी कोणत्या जातीचे हे समजण्याएवढा आपला समाज प्रगल्भ आहे. पण हा प्रगल्भ समाज जातीव्यवस्था मोडून- तोडून, उखडून फेकत नाही त्याचे काय? किंवा ब्राह्मणांच्या नावाने बोंबलण्याशिवाय तो काय करतो?

जातिअंताबाबत आपल्याकडे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. आर्थिक स्तर बदलला, की आपोआप हे बदलेल, असे डावी मंडळीही म्हणतात. पण त्यांच्या ज्ञानाला मर्यादा असल्यामुळे ते तसे बोलतात. जातिव्यवस्था किती अवैज्ञानिक आहे, याबद्दल विचार करणारे किंवा मांडणी करणारे किती लोक आपल्या देशात आहेत? याच्या खोलात गेले तर ते बोटावर मोजण्याइतपत. आज सरळ सरळ लोक म्हणतात की, अस्पृश्यता आता कुणी पाळत नाही. पण, एका सर्वेक्षणानुसार, शहरातले २० टक्के लोक आणि खेड्यातले ३० टक्के लोक हे अस्पृश्यता पाळतात. या सर्वेक्षणामध्ये या लोकांनीच स्वतः ही बाब स्पष्टपणे सांगितली आहे. अस्पृश्यता पाळणाऱ्यांमध्ये ब्राह्मणांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हे सर्वेक्षण सांगते. बीडमध्ये रूम शोधतांना मला देखील आलेला हा अनुभव आहे. हा भेदभाव शहरातले ६२ टक्के ब्राह्मण आणि खेड्यातले ३९ टक्के ब्राह्मण अजूनही पाळतात. याबाबत अन्य मागासवर्गीय (ओबीसी) आणि ब्राह्मणेतर उच्चवर्णीय यांचा क्रमांक लागतो. पण आजचे ओबीसी हे देखील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांचा तिरस्कार करतात. हे ब्राम्हणांचे यश म्हणायचे की ओबीसींचे अपयश?  

बॉलिवूड चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री हा अनेकदा ट्विटरवर सक्रिय असतो. ट्विटर वरील त्याच्या पोस्टमुळे तो नेहमी वादात सापडतो. केंद्रातील मोदी सरकारच्या बाजूने बोलणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांनी मागील वर्षी एक ट्विट केले होते. ज्यामध्ये तो ब्राह्मणांना भारतातून हटवण्याबाबत बोलला. ब्राम्हणांचा  वेगळा देश असल्याचा उल्लेखही त्याने केला होता. सोशल मीडियावर त्यांची तेव्हा मोठ्या प्रमाणात री ओढली गेली. सध्या अग्निहोत्री याची ती पोष्ट सोशल माध्यमावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया देखील लोक देत आहेत. ब्राह्मणांची स्वर्गात ओळख असल्यामुळे त्यांनी तेथे जावे अस्या चुकीच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. प्रतिक्रिया या विवेकवादी असाव्यात असा आमचा सल्ला. प्रतिक्रिया देतांना काहींचे मत असे देखील आहे, ब्राह्मणांना वेगळा देश द्या. ते मूळ भारतातील नाहीत. त्यावर ब्राह्मणांना वेगळ्या देशाची गरज काय? हे लोक आर्य आहेत आणि जेथून ते भारतात आले तेथे त्यांनी परत जावे. त्यांच्या पूर्वाश्रमीच्या इराण आणि मध्य आशियातील लोक त्यांचा अवलंब करतात की नाही ते पाहू अशी ती प्रतिक्रिया.

ब्राह्मण भारताबाहेर गेले तर चांगले, किमान भारतातील गोंधळ साफ होईल. या आणि सर्व तऱ्हेच्या प्रतिक्रियेला आमचे उत्तर असे आहे की, भारतात विषमतावादाची मूल्य ज्या मनुस्मृतीत होती ती मनुस्मृती घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळली. आणि सर्व समाजाला गुलामीतून, मनुस्मृतीच्या बंधनातून बाहेर काढलेले आहे. मनुस्मृतीच्या जागी समता, स्वातंत्र्य, न्याय देणारे संविधान त्यांनी दिले आहे. मागे काही ब्राम्हणांनी संविधान जाळून मनुस्मृतीचा जयघोष केला असला तरी, ब्राह्मणांना या देशातून कुणीही हाकलून देऊ शकत नाही. कारण त्यांना इथे राहण्याचा, मुक्त संचार करण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार ‘मूलभूत हक्कात’ संविधानाने दिलेला आहे. एवढा विशाल दृष्टीकोन आपल्या घटनाकारांचा होता. विवेक अग्निहोत्री एक ब्राम्हण असतांना त्यांनी असे जे विधान केलेले आहे त्याच्या कारणात कुणी गेले नाही. जात नाही. किंबहुना त्यांच्या वक्तव्यावर तर्क- वितर्क लावले जात नाहीत. ब्राह्मणांबद्दलची आपली मनातील किळस गराळण्यापलीकडे लोक काहीही करत नाही. विवेक अग्निहोत्री यांनी या निमित्ताने देशभर चर्चा घडवून आणली. यातून निघणारा कयास म्हणजे, ब्राह्मण हे आजमितीला भारतीय आहेत. आणि  ‘मूलभूत हक्कात’ ते इथे कायद्याने सुरक्षित आहे. पण या मूलभूत  हक्काबद्दल घटनाकार म्हणाले होते की, मूलभूत हक्कांचा सगळ्यात मोठा शत्रू भेदभाव आहे, त्यामुळे मूलभूत हक्कांची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हायची असेल तर सर्व प्रकारचा भेदभाव नष्ट व्हायला हवा,  तसं झालं नाही तर मूलभूत हक्कांना काही अर्थ नाही अशी त्यांची भूमिका होती. समतेचा हक्क हा सर्वाधिक महत्त्वाचा हक्क आहे. लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी हा हक्क अत्यावश्यक आहे. या हक्कांशिवाय इतर हक्कांना काहीच अर्थ उरत नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये समतेच्या हक्कांचा उहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे ब्राह्मणांना दुसरा देश कसा देणार? हा नेटकऱ्यांना आमचा सवाल.

COMMENTS